खळबळजनक! पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचं तालिबानकडून अपहरण, सरकारच्या तोंडचं पाणी पळालं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 18:32 IST2025-01-09T17:26:45+5:302025-01-09T18:32:21+5:30

TTP Kidnap 16 Nuclear Scientists: पाकिस्ताच्या १६ अणुशास्त्रज्ञांचं टीटीपी अर्थात तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलं आहे. अपहरण करण्यात आलेल्या १६ अणुशास्त्रज्ञांचा एक व्हिडीओसुद्धा या संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे.

TTP Kidnap 16 Nuclear Scientists: Sensational! 16 Pakistani nuclear scientists kidnapped by terrorists, government's mouth watering | खळबळजनक! पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचं तालिबानकडून अपहरण, सरकारच्या तोंडचं पाणी पळालं 

खळबळजनक! पाकिस्तानच्या १६ अणुशास्त्रज्ञांचं तालिबानकडून अपहरण, सरकारच्या तोंडचं पाणी पळालं 

पाकिस्ताच्या १६ अणुशास्त्रज्ञांचं टीटीपी अर्थात तहरिक ए तालिबान पाकिस्तान या दहशतवादी संघटनेनं अपहरण केलं आहे. अपहरण करण्यात आलेल्या १६ अणुशास्त्रज्ञांचा एक व्हिडीओसुद्धा या संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आला आहे. या व्हिडीओमधून अपहृत अणुशास्त्रज्ञ हे पाकिस्तानमधील शाहबाज शरीफ यांच्या नेतृत्वाखालील सरकारला दहशतवाद्यांच्या मागण्या मान्य करण्याची आणि आपलं रक्षण करण्याची विनंती करताना दिसत आहेत.  सध्या पाकिस्तानच्या आण्विक ऊर्जा आयोगाचे हे १६ तज्ज्ञ टीटीपीच्या ताब्यात आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यात करण्यात येत असलेल्या दाव्यानुसार टीटीपीने डेरा इस्माइल खान येथे पाकिस्तानच्या ऊर्जा आयोगाच्या ह्या तज्ज्ञांना पकडले आहे. आता पाकिस्तानच्या अणुशास्त्रज्ञांची झालेली ही अवस्था म्हणजे पाकिस्तानमधील बिघडत असलेली सुरक्षा व्यवस्था आणि लष्कराच्या हतबलतेचं उदाहरण आहे, अशी टीका करण्यात येत आहे.

धक्कादायक बाब म्हणजे तहरिक ए तालिबान पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी पाकिस्तानमधील सर्वात मोठ्या युरेनियमच्या खाणीमधून मोठ्या प्रमाणात युरेनियम लुटून नेल्याचा दावाही करण्यात येत आहे. हे युरेनियम अणुबॉम्ब तयार करण्यासाठी वापरण्यात येतं.

दरम्यान, या अपहरण कांडाबाबत टीटीपीच्या नेत्यांचीही प्रतिक्रिया समोर आली आहे. त्यांनी सांगितलं की, आम्ही अणुऊर्जा अधिकाऱ्यांना कुठलीही इजा पोहोचवण्याच्या इराद्यांनं त्यांचं अपहरण केलेलं नाही. तर काही मागण्या मान्य करून घेण्यासाठी ताब्यात घेतलं आहे. सरकारने आमचं हल्ल्यांपासून वाचवावं आणि लोकांच्या जीविताचं रक्षण करावं, यासाठी आम्ही हे पाऊल उचललं आहे.  आमच्या मागण्या सरकारने मान्य कराव्यात, अशी मागणीही त्यांनी केली आहे.  

Web Title: TTP Kidnap 16 Nuclear Scientists: Sensational! 16 Pakistani nuclear scientists kidnapped by terrorists, government's mouth watering

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.