प्रचंड मोठ्या ब्लॅक होलमधून निघाली त्सुनामी ? NASA ने शेअर केला आश्चर्यजनक फोटो...
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 6, 2021 16:30 IST2021-07-06T16:22:53+5:302021-07-06T16:30:12+5:30
tsunami from supermassive blackhole: पाहा कशाप्रकारे मोठ्या ब्लॅक होलमधून 'त्सुनामी'च्या लाटा निघतात

प्रचंड मोठ्या ब्लॅक होलमधून निघाली त्सुनामी ? NASA ने शेअर केला आश्चर्यजनक फोटो...
अमेरिकेतील अंतराळ संस्था नासा(NASA)आपल्या सोशल मीडिया अकाउंट्सवरुन नेहमीच अंतराळातील विविध फोटोज किंवा व्हिडिओज शेअर करत असतात. असाच एक फोटो नासाने शेअर केला आहे. पण, हा फोटो इतर फोटोंपेक्षा विशेष आहे. या फोटोमधून नासाने अंतराळातील ब्लॅक होलमधून बाहेर पडणारी (tsunami from super massive black holes) 'त्सुनामी' दाखवली आहे. एखाद्या सायंस फिक्शन चित्रपटातील दृष्य असल्यासारखा हा फोटो दिसत आहे.
नासाने या फोटोसह त्या त्सुनामीसदृष्य घटनेबद्दल माहिती दिली आहे. "एखाद्या सायंस फिक्शन थ्रिलरसाठी 'सुपरमॅसिव ब्लॅक होल त्सुनामी' नाव योग्य आहे,"असे कॅप्शन नासाने दिले आहे. तसेच, "अभ्यासकांनी कॉम्प्यूटर सिमुलेशनचा उपयोग अंतराळातील गुढ रहस्य जाणून घेण्यासाठी केला असून, सुपरमॅसिव ब्लॅक होलच्या गुरुत्वाकर्षणापासून वाचण्यासाठी अंतराळातील गॅसेस त्सुनामीसारखे आकार घेतात', अशी माहिती नासाने दिली.
पोस्टच्या शेवटी नासाने भविष्यातील विविध मिशन्ससाठी चांगले पुरावे मिळाल्याचेही सांगितले. नासाने 2 दिवसांपूर्वी हा फोटो शेअर केला होता. तेव्हापासून आतापर्यंत या फोटोवर 13 लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत. या फोटोवर युझर विविध कमेट्स करत आहेत.