ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2025 06:51 IST2025-09-07T06:51:01+5:302025-09-07T06:51:48+5:30

Tariff on India: अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने २ एप्रिलला काही गोष्टींसाठी परस्पर कर लागू केले होते. त्यात आता नव्याने बदल करण्यात आले आहेत.

Trump's U-turn! Changes in tariff regime; Exemptions for some goods including important minerals and pharmaceutical products | ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट

ट्रम्प यांचा यु-टर्न! टॅरिफ पद्धतीत केले बदल; महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना सूट

न्यूयॉर्क : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नुकतीच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आपले मित्र म्हटले होते. त्यानंतर आता ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर लादलेल्या शुल्कात (टॅरिफ) काही बदल केले आहेत. त्यांनी काही वस्तूंना परस्पर करातून सूट दिली आहे. म्हणजेच आता ट्रम्प यांचे परस्पर करातील शुल्क फक्त काही निवडक उत्पादनांवरच लागू होईल.

अमेरिकेच्या व्हाईट हाऊसने २ एप्रिलला काही गोष्टींसाठी परस्पर कर लागू केले होते. त्यात आता नव्याने बदल करण्यात आले आहेत. आता सराफी बाजाराशी संबंधित वस्तू आणि काही महत्त्वाची खनिजे व औषधी उत्पादनांसह काही वस्तूंना शुल्कातून सूट उत्पादनांसह काही वस्तूंना शुल्कातून सूट दिली आहे.

दरम्यान, नवीन आदेशात अल्युमिनियम हायड्रॉक्साईड, रेझिन आणि सिलिकॉन उत्पादने देखील समाविष्ट आहेत, ज्यावर परस्पर शुल्क आकारले जाईल, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. शुक्रवारी जारी केलेल्या कार्यकारी आदेशात हा बदल करण्यात आला आहे. हे बदल सोमवारपासून लागू होतील.

या गोष्टींवर शुल्क नाही

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एक विशेष आदेश जारी केला ज्यामध्ये ग्रेफाइट, टंगस्टन, युरेनियम, सोने आणि इतर अनेक धातूंवरील देश-आधारित शुल्क काढून टाकण्यात आले आहेत. परंतु सिलिकॉन उत्पादनांवर शुल्क लादण्यात आले आहे. 

वाणिज्य विभागाकडून आधीच चौकशी सुरू असलेल्या स्यूडोफेड्रिन, अँटीबायोटिक्स आणि काही इतर औषधे यांनाही या नवीन आदेशामुळे दिलासा मिळाला आहे. सिलिकॉन उत्पादनांव्यतिरिक्त, ट्रम्प यांनी रेझिन आणि अल्युमिनियम हायड्रॉक्साईडवरील शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे.

ट्रम्प यांचे दर हे व्यापारातील असंतुलन दूर करण्याच्या मोठ्या योजनेचा एक भाग आहेत, ज्याला त्यांनी राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे. गेल्या महिन्यात अनेक देशांवर वैयक्तिक दर लादण्यापूर्वी, ट्रम्प यांनी काही देशांशी करार केले; ज्यामध्ये परदेशी गुंतवणूकदार कमी दराच्या बदल्यात अमेरिकन वस्तूंवरील निर्बंध उठवतील.

काही महिन्यांत त्यांनी घाईघाईने पारित केलेले दर आणि इतर करारांमुळे चिंता निर्माण झालेली. कारण बाजारपेठेत याचा अडथळा निर्माण होऊ शकतो व अमेरिकेत बनवता येत नाहीत किंवा मिळवता येत नाहीत अशा वस्तूंच्या किमती वाढू शकत होत्या.

Web Title: Trump's U-turn! Changes in tariff regime; Exemptions for some goods including important minerals and pharmaceutical products

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.