राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, खटला दाखल; मस्क यांचंही टेन्शन वाढलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2025 09:42 IST2025-01-21T09:41:58+5:302025-01-21T09:42:20+5:30
Donald Trump News: अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉइज (AFGE) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिझनने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफीशिएंसी (DOGE) योजनेसंदर्भात त्यांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला आहे.

राष्ट्राध्यक्ष होताच ट्रम्प यांच्या अडचणीत वाढ, खटला दाखल; मस्क यांचंही टेन्शन वाढलं
अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतल्यानंतर, काही मिनिटांतच खटल्याचा सामना करावा लागत आहे. अमेरिकन फेडरेशन ऑफ गव्हर्नमेंट एम्पलॉइज (AFGE) आणि नॉन प्रॉफिट पब्लिक सिटिझनने डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट एफीशिएंसी (DOGE) योजनेसंदर्भात त्यांच्या विरोधात खटला दाखल दाखल करण्यात आला आहे. DOGE चे नेतृत्व एलन मस्क करत आहेत. ज्याचा उद्देश्य सरकारी खर्च कमी करणे आहे.
ट्रम्प प्रशासनाच्या प्रस्तावित DOGE योजनेचे लक्ष्य सरकारी खर्च 2 ट्रिलियन डॉलरपर्यंत कमी करणे आहे. या योजनेमुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये नोकरी जाण्याच्या भीती निर्माण झाली आहे. AFGE चे म्हणणे आहे की, DOGE योजना संघीय नियमांचे पालन करत नाही. तसेच, आवश्यक नियमांचे पालन करेपर्यंत DOGE ला सल्लागार समिती म्हणून काम करण्यापासून रोखण्यात यावे, अशी अपीलही न्यायालयाकडे करण्यात आली आहे.
एलन मस्क यांची भूमिका -
डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफीशिएन्सीची जबाबदारी एलन मस्क यांच्याकडे देण्यात आली आहे. मात्र, मस्क यांच्या भूमिकेबद्दल चिंता आहे की, त्यांची योजना सरकारी कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्या आणि हितांवर प्रतिकूल परिणाम करू शकते. AFGE ने यावर आक्षेप घेत, या योजनेंतर्गत करण्यात आलेल्या कपातीमुळे कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांना धोका निर्माण होऊ शकतो, असे म्हटले आहे.
ट्रम्प यांचा शपथविधी आणि घोषणा -
शपथविधीनंतरच्या भाषणात डोनाल्ड ट्रम्प यांनी २० जानेवारीला 'लिबरेशन डे' अथवा 'मुक्ती दिन' म्हणत, अमेरिकेचा 'सुवर्णयुगा'ला प्रारंभ झाला असल्याचे म्हटेल आहे. 'अमेरिका फर्स्ट' या अजेंड्यावर भर देत ट्रम्प म्हणाले, आपण देशाला सुरक्षित, परवडणारे आणि ऊर्जा क्षेत्रात अग्रणी बनवण्यासाठी धाडसी पावले उचलणार आहोत. याशिवाय, बायडेन प्रशासनाची धोरणे बदलण्यासाठी आणि सीमा सुरक्षा मजबूत करण्यासाठीही त्यांनी अनेक कार्यकारी आदेशांचीही घोषणा केली.