‘नासा’च्या दोन मोहिमांवर आता ट्रम्प यांची वक्रदृष्टी; शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 08:52 IST2025-08-09T08:50:05+5:302025-08-09T08:52:44+5:30

ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा स्रोत बंद होऊ शकतो. अमेरिकेच्या २०२६साठीच्या

Trump's Crooked vision on two NASA missions now; Scientists' tension increases | ‘नासा’च्या दोन मोहिमांवर आता ट्रम्प यांची वक्रदृष्टी; शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढलं

‘नासा’च्या दोन मोहिमांवर आता ट्रम्प यांची वक्रदृष्टी; शास्त्रज्ञांचं टेन्शन वाढलं

वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखालील प्रशासनाची वक्रदृष्टी आता अमेरिकी एअरॉनॉटिक्स व अंतराळ व्यवस्थापन (नासा) संस्थेवर पडली असून, या संस्थेच्या दोन मोहिमा बंद करण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. कार्बन उत्सर्जन आणि रोपांच्या आरोग्याबाबत माहिती देणाऱ्या या मोहिमा आहेत.

ट्रम्प प्रशासनाने हा निर्णय घेतला तर या क्षेत्रातील शास्त्रज्ञ, धोरणकर्ते आणि शेतकऱ्यांसाठी आवश्यक असलेल्या माहितीचा स्रोत बंद होऊ शकतो. अमेरिकेच्या २०२६साठीच्या
आर्थिक तरतुदीसंबंधी प्रस्तावात ‘ऑर्बिटिंग कार्बन ऑब्झर्व्हेटरी’ मोहिमांसाठी कोणतीही तरतूद करण्यात आलेली नाही.

काय आहेत या मोहिमा?
नासा’च्या या मोहिमा पिकांची वाढ आणि कार्बन उत्सर्जन नेमके कुठे अधिक, कुठे कमी होत आहे हे सांगू शकतील. शिवाय उत्सर्जित झालेला कार्बन डायऑक्साईड वायू सर्वाधिक प्रमाणात कुठे शोषला जात आहे, हेपण यातून स्पष्ट होऊ शकणार आहे.

‘ही राष्ट्रीय संपत्ती’  
‘नासा’चे सेवानिवृत्त शास्त्रज्ञ डेव्हिड क्रिस्प यांच्यानुसार, या मोहिमा एक राष्ट्रीय संपत्ती आहेत. जगातील अशा प्रणालींच्या तुलनेत अचूक माहिती देणारे हे प्रकल्प आहेत. हे प्रकल्प वाचवण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत, असेही ते म्हणाले. 

मोहिमेमुळे हे मिळाले निष्कर्ष  
अमेझॉनसारख्या जंगलांत जेवढा कार्बन शोषून घेतला जातो त्यापेक्षा कितीतरी अधिक प्रमाणात तो उत्सर्जित होत असल्याचे या मोहिमांतून सिद्ध झाले आहे;  तर, कॅनडा, रशिया आणि हिमनग ज्या भागांत वितळतात, अशा ठिकाणी असलेल्या जंगलांत कार्बन अधिक शोषून घेतला जातो.

Web Title: Trump's Crooked vision on two NASA missions now; Scientists' tension increases

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.