ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 17:47 IST2026-04-09T17:46:07+5:302026-04-09T17:47:50+5:30

सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे.

Trump's claim creates a stir 100 missiles Pakistan which calls itself a 'peacemaker' with just one claim, is exposed China's veil is torn | ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला

ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला

अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव निवळण्याऐवजी पुन्हा एकदा चिघळण्याच्या स्थितीत आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता एक अत्यंत खळबळजनक दावा केला आहे. तेहराणकडून अमेरिकन युद्धनौकांवर डागण्यात आलेली १०० हून अधिक क्षेपणास्त्रे पाकिस्तानमार्फत इराणपर्यंत पोहोचवण्यात आली होती आणि या मागे चीनचा हात होता. मात्र, ती क्षेपणास्त्रे अमेरिकेच्या नौदलाने यशस्वीरित्या रोखली, असा गंभीर आरोप ट्रम्प यांनी केला आहे. 

युद्धविराम धोक्यात -
सीजफायरची घोषणा झाल्यानंतर काही तासांतच इराणमधील रिफायनरीवर हल्ले झाले, तर इराणने कुवैत आणि बहरीनवर हल्ले केल्याच्या बातम्या समोर आल्या. दुसरीकडे, इस्रायलने लेबनानवर जोरदार क्षेपणास्त्र मारा केल्याने युद्धविरामाची स्थिती पारच कमकुवत झाली आहे.

होर्मुजची सामुद्रधुनी बंद करण्याचा इशारा -
दरम्यान, या घडामोडींनंतर इराणने 'स्ट्रेट ऑफ होर्मुज' बंद करण्याची धमकी दिली आहे. जर लेबनानवर इस्रायलचे हल्ले थांबले नाहीत, तर युद्धविरामाला (सीजफायरला) अर्थ राहणार नाही, असा इशारा इराणने दिला आहे. तर, इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनीही, आपले "मिशन अद्याप अपूर्ण" असल्याचे सांगत लेबनानमधील कारवाई सुरूच ठेवण्याचे संकेत दिले आहेत. महत्वाे म्हणजे, या संपूर्ण आरोप-प्रत्यारोपामुळे मध्यपूर्वेतील परिस्थिती पुन्हा एकदा मोठ्या संघर्षाकडे वळताना दिसत आहे.

 

Web Title : ट्रंप के दावे से खलबली: 100 मिसाइलें, पाकिस्तान बेनकाब, चीन का पर्दाफाश।

Web Summary : ट्रंप का दावा है कि ईरान को पाकिस्तान के माध्यम से चीन की मदद से मिसाइलें मिलीं। ईरान और लेबनान पर हमलों से युद्धविराम को खतरा, तनाव बढ़ा। ईरान ने होर्मुज जलडमरूमध्य को बंद करने की धमकी दी; इजरायल ने लेबनान में कार्रवाई जारी रखी।

Web Title : Trump's claim sparks uproar: 100 missiles, Pakistan exposed, China unmasked.

Web Summary : Trump claims Iran received missiles via Pakistan with China's help. Tensions escalate as ceasefire faces threats from attacks on Iran and Lebanon. Iran threatens to close the Strait of Hormuz; Israel continues Lebanon operations.