शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
5
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
6
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
7
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
8
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
9
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
10
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
11
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
12
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
13
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
14
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
15
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
16
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
17
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
18
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
19
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
20
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
Daily Top 2Weekly Top 5

इराण-अमेरिका वादात ट्रम्प यांचा भारताला ओढण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 06:26 IST

सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे.

वॉशिंग्टन/बगदाद : इराणच्या रेव्होल्युशनरी गार्ड सैन्यदलातील ‘कुद््स फोर्स’ या विशेष विभागाचे कमांडर जनरल कासेम सुलेमानी यांच्या ड्रोन हल्ल्याद्वारे हत्येचे जोरदार समर्थन करीत, अमेरिकेने आखातातील हितसंबंध जपण्यासाठी ३,२०० सैनिकांची नवी कुमक तिकडे रवाना केली आहे. नवी दिल्ली तसेच लंडन शहरात दहशतवादी हल्ल्याचे कट रचण्यात कासेम सुलेमानी याचा सहभाग होता, असा आरोप करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराण-अमेरिका वादात भारताला ओढण्याचा प्रयत्न केला आहे.जनरल सुलेमानी व इराकच्या निमलष्करी दलांचे उपप्रमुख अबु महदी अल मुहंदिस यांच्यासह हल्ल्यात ठार झालेल्या शहिदांच्या बगदादमध्ये निघालेल्या अंत्ययात्रेत सूडाच्या घोषणा देत हजारो इराकी नागरिक सामील झाले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुलेमानी यांच्या हत्येचे जोरदार समर्थन केले. युद्ध सुरू करण्यासाठी नव्हे, तर ते भडकू नये यासाठी ही कारवाई करण्यात आल्याचे सांगून ट्रम्प म्हणाले की, सुलेमानी व त्यांच्या दहशतवादी पथकांनी अमेरिकेच्याच नव्हे, तर इतर अनेक देशांच्या हजारो निष्पाप नागरिकांचे प्राण घेतले होते.अमेरिका व इराण यांच्यातील संबंध ताणले असताना आणि हे दोन्ही देश युद्धाच्या तोंडाशी उभे असताना अमेरिकेने इराकमध्ये इराण समर्थक ताफ्यावर शनिवारी पुन्हा हल्ला केला. हशद अल शाबी या सशस्त्र दलाच्या वैद्यकीय ताफ्यावर अमेरिकेने हा हल्ला केल्याचे वृत्त इराकच्या सरकारी टीव्हीने दिले. मात्र नंतर अमेरिकेने व हशद अल शाबीनेही याचा इन्कार केला.अमेरिकेचे संरक्षणमंत्री माइक पॉम्पेओ यांनी अनेक मित्रदेशांच्या नेत्यांना फोन करून सुलेमानी यांची हत्या व त्यामुळे उद्भवू शकणाऱ्या संभाव्य परिस्थितीची माहिती दिली. पाकिस्तानमध्ये त्यांनी पंतप्रधान इम्रान खान वा संरक्षणमंत्र्यांऐवजी लष्करप्रमुख जनरल आसिफ बाजवा यांना फोन केला. यावरून राजकीय नेतृत्वाने तीव्र नाराजी व्यक्त केली. >सुलेमानी यांच्या मृत्यूनिमित्त इराणने तीन दिवसांचा राजकीय दुखवटा जाहीर केला. बगदाद येथील विराट अंत्ययात्रेनंतर ड्रोन हल्ल्यात मारल्या गेलेल्या मुहंदिस यांच्यासह इराकच्या मृतांवर उत्तरेकडील नज्फ या पवित्र शहरात अंत्यविधी करण्यात आले. सुलेमानी व त्यांच्या सहकारी अधिकाऱ्यांचे मृतदेह अंत्यविधीसाठी इराणला पाठविण्यात आले.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पIranइराणqasem soleimaniकासीम सुलेमानी