शहरं
Join us  
Trending Stories
1
Lokmat Exclusive: ठाकरे मुंबई नक्कीच गमावतील, महापालिकांमध्ये निवडणुकोत्तर नवीन समीकरणे: CM देवेंद्र फडणवीस
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार ९ जानेवारी २०२६; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
3
ठाकरेंच्या गुहेत एकनाथ शिंदे यांची कठीण परीक्षा; भाजपा मदतीने तगडे आव्हान पार केले तर...
4
आंदोलकांचा इराणच्या राजधानीवर कब्जा! रात्रीच्या अंधारात सरकारी कार्यालये ताब्यात, तेहरानने हवाई क्षेत्र बंद केले...
5
“सत्ताधाऱ्यांची हुकूमशाही, मी पाहिलेली आजवरची ही सर्वांत घाणेरडी निवडणूक”: अमित ठाकरे
6
…तर अमेरिका भारतावर ५०० टक्के टॅरिफ लादणार; डोनाल्ड ट्रम्प प्रशासन धक्का देण्याच्या तयारीत
7
ममतांच्या ‘वॉर रूम’वर ईडीचा पहाटे ६ वाजता छापा; प्रशांत किशोर स्थापित ‘आयपॅक’वर धाडी
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या टार्गेटवर पुन्हा एकदा भारत; अमेरिका आंतरराष्ट्रीय सौर आघाडीतूनही बाहेर
9
महायुतीने चार प्रभाग निवडणुकीआधीच गमावले; बंडखोरीची केली चिंता, पण बसला मोठा फटका
10
काँग्रेस-वंचित युतीकडे ३६ जागांवर उमेदवारच नाही; काँग्रेसकडे २०, वंचितकडे १६ उमेदवारांचा अभाव
11
कोणाचे डिपॉझिट होणार जप्त? ९ पालिकांच्या तिजोरीत २ कोटी ६२ लाख जमा; मुंबईत १७०० उमेदवार
12
महायुतीत १५३ कोट्यधीश उमेदवार, चंदन शर्मा सर्वात श्रीमंत; सोनाली जाधवांकडे फक्त ४४ हजार
13
माजी आमदार, महापौरांच्या संपत्तीत झाली लक्षणीय वाढ; मालमत्तेचा विषय चर्चेचा ठरतोय
14
४ उमेदवारांनी निवडला समाजसेवा ‘व्यवसाय’; शिक्षणासह व्यावसायिक पार्श्वभूमीचे चित्र स्पष्ट
15
कार्यकर्त्यांना नाष्ट्याला कुठे तर्रीदार मिसळ-पाव, तर कुठे जिलेबी, फाफडा; दोन्ही वेळेला जेवणही!
16
महापालिका निवडणूक क्षेत्रात १५ जानेवारीला सुट्टी; राज्य सरकारकडून अधिसूचना जारी
17
महायुद्धाचे संकेत? 'या' २१ देशात प्रवास करू नका; अमेरिकन नागरिकांसाठी Travel Advisory जारी
18
बंडखोरांसह ३२ जणांचं ६ वर्षासाठी निलंबन; छुपा प्रचार करणाऱ्यांची गय करणार नाही, भाजपाचा इशारा
19
द बर्निंग ट्रेन! मुंबईत लोकलला भीषण आग; ऐन गर्दीच्या वेळी मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत
20
"माझं खरं नाव आशिष नाही तर अब्दुल..."; लव्ह जिहादवरून नितेश राणेंचा पुन्हा प्रहार
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेची सर्वात मोठी EXIT! ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटनांमधून बाहेर पडली, संयुक्त राष्ट्रांसह भारतालाही धक्का...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2026 07:52 IST

Trump US Withdraws International organizations: ट्रम्प यांच्या या निर्णयामुळे जागतिक राजकारणात अमेरिका पुन्हा एकदा एकलकोंड्या भूमिकेकडे झुकत असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. भारतासाठी हा राजनैतिक स्तरावर मोठा धक्का मानला जात असून, आता इतर देशांच्या सोबतीने भारत ही आघाडी कशी टिकवून धरतो, याकडे जगाचे लक्ष लागले आहे.

विस्तारवादी मानसिकतेत असलेल्या अमेरिकेने अवघ्या जगाला धक्का देणारा निर्णय घेतला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी 'अमेरिका फर्स्ट' या आपल्या धोरणाला अधिक आक्रमक करत जागतिक राजकारणात खळबळ माजवून दिली आहे. भारताच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स' (ISA) सह तब्बल ६५ हून अधिक आंतरराष्ट्रीय संघटना आणि करारांमधून बाहेर पडण्याचा औपचारिक निर्णय ट्रम्प प्रशासनाने घेतला आहे.

ट्रम्प यांनी एका महत्त्वपूर्ण मेमोरँडमवर स्वाक्षरी केली असून, अमेरिकेच्या हिताच्या आड येणाऱ्या किंवा अमेरिकेच्या सार्वभौमत्वाला धोका निर्माण करणाऱ्या जागतिक संस्थांमधून तात्काळ बाहेर पडण्याचे आदेश दिले आहेत. यामध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सच्या पुढाकाराने आकाराला आलेल्या 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स'चा प्रामुख्याने समावेश आहे. व्हाइट हाऊसने सर्व सरकारी विभागांना या संस्थांमधून बाहेर पडण्याची प्रक्रिया जलद गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच, संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांना दिला जाणारा निधीही कायद्याच्या चौकटीत राहून रोखला जाणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

अमेरिकेची भूमिका काय? अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबिओ यांनी या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे की, "राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी अमेरिकन जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे. ज्या जागतिक नोकरशहांच्या संघटना अमेरिकेच्या हिताच्या विरोधात काम करतात किंवा जिथे अमेरिकन करदात्यांच्या पैशांची उधळपट्टी होते, अशा संस्थांना आम्ही यापुढे सबसिडी देणार नाही."

या संघटनांवरही पडली कुऱ्हाड: ट्रम्प प्रशासनाने ३५ गैर-संयुक्त राष्ट्र संघटना आणि ३१ संयुक्त राष्ट्रांच्या संस्थांमधून माघार घेतली आहे. यामध्ये प्रामुख्याने खालील संस्थांचा समावेश आहे:

इंटरनॅशनल सोलर अलायन्स (ISA)

इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर (IUCN)

इंटरगव्हर्नमेंटल पॅनेल ऑन क्लायमेट चेंज (IPCC)

युएन वॉटर (UN Water)

युएन पॉप्युलेशन फंड (UNPF)

भारतावर काय परिणाम होणार? 'इंटरनॅशनल सोलर अलायन्स' हे पंतप्रधान मोदींचे एक महत्त्वाचे जागतिक स्वप्न आहे. सौर ऊर्जेच्या क्षेत्रात भारताला जागतिक नेता बनवण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे होते. मात्र, अमेरिकेने माघार घेतल्यामुळे या अलायन्सच्या निधीवर आणि जागतिक प्रभावावर परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विशेषतः हवामान बदलाच्या लढाईत अमेरिकेने घेतलेली ही माघार जगासाठी चिंतेचा विषय ठरू शकते.

English
हिंदी सारांश
Web Title : US exits global bodies, impacting India's solar alliance initiative.

Web Summary : US withdraws from over 65 international organizations, including the International Solar Alliance. Trump's 'America First' policy drives the decision, citing financial burden and sovereignty concerns. This move impacts global climate initiatives and India's leadership in solar energy.
टॅग्स :AmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्पIndiaभारतunited nationsसंयुक्त राष्ट्र संघ