शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
2
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षीक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
3
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
4
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
5
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीचं धक्कादायक कृत्य
6
Amit Shah Helicopter: अमित शाहांच्या हेलिकॉप्टरमध्ये उतरत असतानाच तांत्रिक बिघाड, प्रचारसभा रद्द 
7
पार्शियन आखातात अडकलं जग, दक्षिण सुदानमध्ये भारतीयांची जबरदस्त कामगिरी: UN ने केले कौतुक
8
"मी जे सांगेन, तेच इस्रायल करेल", डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा, इराण युद्धाबद्दल आता काय बोलले?
9
इनकम टॅक्स रिटर्न भरण्याची प्रक्रिया कधी सुरू होईल? ITR-1 फॉर्ममध्ये मोठा बदल? तुमच्यासाठी कोणता?
10
IPL 2026: आयपीएलमध्ये रिंकू सिंहनं इतिहास घडवला, आंद्रे रसेलसह स्टार क्रिकेटपटूंना टाकलं मागं! 
11
अन्नामलाईंना उमेदवारी नाकारली, तामिळनाडूत भाजपाचा धक्कादायक निर्णय, कारण काय? 
12
कमाल! नणंद-भावजयीने फडकवला यशाचा झेंडा; एक DSP तर दुसरी टॅक्स ऑफिसर, रचला इतिहास
13
मुंबईची 'तुंबई' होऊ नये म्हणून ६० दिवसांत काढायचाय ९ लाख मेट्रिक टन गाळ, कंत्राटदारांच्या आडमुठेपणामुळे 'उशीर'
14
Raghav Chadha: राघव चड्ढा की परिणीती चोप्रा; दोघांपैकी कोण आहे सर्वाधिक श्रीमंत; किती आहे नेटवर्थ?
15
लग्नानंतर पती-पत्नीने केली कमाल! मेहनतीनं अभ्यास करून एकाचवेळी दोघेही बनले सरकारी अधिकारी
16
Travel : 'भारताचं स्कॉटलँड' पाहिलंय का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मनाली-शिमला सोडा, 'या' नंदनवनाला नक्की भेट द्या!
17
१ एप्रिलपासून खिसा रिकामा होणार की भरणार? 'या' १० मोठ्या बदलांचा तुमच्या बजेटवर होणार थेट परिणाम
18
इराणचा अमेरिकन टेकन कंपनी 'Oracle' वर हल्ला; Google, Meta सह 'या' कंपन्यांना दिला इशारा...
19
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
20
सीमा हैदरच्या मुलाचं झालं बारसं; असं नाव ठेवलं की पाकिस्तानला मिरची लागेल!
Daily Top 2Weekly Top 5

ट्रम्प सर्वात शक्तीशाली नाहीत, मोदी आणि जिनपिंग यांची स्थिती त्यांच्या पेक्षाही चांगली! अमेरिकन तज्ज्ञाचा दावा; स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2026 10:11 IST

"राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सर्वात शक्तिशाली नेते नाहीत, तर शी जिनपिंग आणि मोदी अधिक शक्तीशाली आहेत. कारण..."

अमेरिकेतील राजकीय विश्लेषक इयन ब्रेमर यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प, चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संदर्भात मोठे विधान केले आहे. त्यांनी ट्रम्प यांच्या तुलनेत चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अधिक सरस असल्याचे म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, ट्रम्प सातत्याने टॅरिफच्या माध्यमातून अमेरिकेला नफा मिळवून देणे, युद्ध थांबवणे आणि आपण नोबेलसाठी कसे योगेय व्यक्ती आहोत, यासंदर्भात दावे करत आहेत. 

'इंडिया टुडे'शी बोलताना इयन ब्रेमर म्हणाले, "अमेरिका हा जगातील सर्वात शक्तिशाली देश असला तरी, ट्रम्प यांच्या बाबतीत तसे म्हणता येणार नाही. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प हे सर्वात शक्तिशाली नेते नाहीत, तर शी जिनपिंग हे अधिक शक्तीशाली आहेत. कारण जिनपिंग यांना मध्यावधी निवडणुकांना सामोरे जावे लागत नाही किंवा त्यांच्याकडे स्वतंत्र न्यायपालिकाही नाही. ट्रम्प तीन वर्षांनंतर पदावर नसतील, मात्र जिनपिंग कायम असतील."

ब्रेमर पुढे म्हणाले, "ट्रम्प माध्यमांचे लक्ष वेधून घेत असले, तरी शी जिनपिंग आणि पंतप्रधान मोदी हे त्यांच्यापेक्षाही अधिक चांगल्या स्थितीत आहेत. मोदींसंदर्भात बोलताना ते म्हणाले, मोदी दीर्घ कार्यकाळामुळे देशात मोठे बदल घडवू शकतात आणि दीर्घकालीन फायदे बघू शकतात. तशी संधी ट्रम्प अथवा युरोपातील नेत्यांना नाही.

मोदींच्या सत्तेतील सातत्य आणि धोरणांमधील स्पष्टता त्यांना युरोपीय नेत्यांच्या तुलनेत अधिक प्रभावीपणे आपली भूमिका मांडण्याची शक्ती देते. त्यांच्या या स्थिरतेमुळेच ते दबावाचा यशस्वीपणे सामना करू शकतात आणि आपण हे गेल्या काही काळात प्रत्यक्षपणे अनुभवले आहे, असेही ब्रेमर यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Modi and Jinping More Powerful Than Trump: American Analyst

Web Summary : Analyst Ian Bremmer says China's Xi Jinping and India's Narendra Modi are more powerful than Trump. Their long tenures allow for impactful policy changes and stability, unlike Trump's situation.
टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीAmericaअमेरिकाDonald Trumpडोनाल्ड ट्रम्प