ट्रम्प कोणाचेच होऊ शकत नाहीत, अमेरिकेसाठी तालिबानविरोधात १६०० अफगाण योद्धे लढले, आता पाकमध्येच अडकले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 16:29 IST2025-01-24T16:28:56+5:302025-01-24T16:29:19+5:30
अमेरिकेचा निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. यामुळे त्यांची तिकिटे काढलेली रद्द करावी लागली.

ट्रम्प कोणाचेच होऊ शकत नाहीत, अमेरिकेसाठी तालिबानविरोधात १६०० अफगाण योद्धे लढले, आता पाकमध्येच अडकले
अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी एका आदेशाने अनेकांच्या स्वप्नांना सुरुंग लावला आहे. यामुळे हजारोंच्या संख्येने जगभरातील विविध देशांत हजारो लोक अडकले आहेत. अमेरिकेचा निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम स्थगित करण्यात आला आहे. अमेरिकेने शरणग्रस्तांना मंजुरी देऊनही अनेकजण आता ना घरका ना घाट का अशा अवस्थेत आहेत. यातच १६०० अफगाणी योद्धे पाकिस्तानाच अडकले आहेत.
तालिबानच्या विरोधात लढण्यासाठी सुमारे १६०० लढवय्यांनी अमेरिकेची मदत केली होती. अमेरिका सोडून जाताच तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानवर कब्जा केला. यामुळे या योद्ध्यांनी पाकिस्तानात पळ काढला होता. तेव्हा पाकिस्तानला अमेरिकेने या योद्ध्यांना आपल्या देशात काही काळ राहण्यास द्यावे असे सांगत नंतर त्यांना आम्ही अमेरिकेत शरण देऊ असे आश्वासन दिले होते. बायडेन सरकारने देखील या शरणार्थिंना अमेरिकेत शरण देण्यास मंजुरी दिली होती. त्यांच्या विमानांची तिकिटेही काढण्यात आली होती. परंतू, आता ट्रम्प यांनी सर्वच रद्द केल्याने त्यांची तिकीटेही रद्द कराली लागली आहेत.
ट्रम्प यांच्या स्थलांतरितांबाबतच्या धोरणांमुळे, अफगाण निर्वासितांना शक्य तितक्या लवकर अमेरिकेत पोहोचायचे होते. ट्रम्प काहीतरी आडमुठा निर्णय घेतील असे पाकिस्तानलाही वाटत होते. म्हणून अफगाण निर्वासितांना लवकर अमेरिकेत पाठवण्याची व्यवस्था करण्यात आली. सत्तेत येताच ट्रम्प यांनी निर्वासित पुनर्वसन कार्यक्रम ज्या पद्धतीने रद्द केला त्यामुळे अमेरिकेत आश्रय मागणाऱ्या पाकिस्तानी निर्वासितांसह इतरांना धक्का बसला आहे.
१०००० लोक अडकले...
विविध देशांतील १०,००० हून अधिक लोकांना अमेरिकेत आश्रयासाठी मंजुरी देण्यात आली होती आणि त्यांची विमान तिकिटे पुढील काही आठवड्यांसाठी नियोजित होती, जी आता रद्द करावी लागत आहेत. ट्रम्प यांच्या आदेशानुसार, निर्वासित कार्यक्रम २७ जानेवारी रोजी स्थानिक वेळेनुसार १२:१० वाजता लागू होईल आणि अंतिम मुदतीपूर्वी किती निर्वासित अमेरिकेत पोहोचू शकतील हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.