शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
4
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
5
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
6
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
7
६ धावांत ४ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
8
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
9
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
10
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
11
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
12
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
13
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
14
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
15
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
16
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
17
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
18
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
19
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
20
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका

स्वातंत्र्यदिनीच पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर, कर्जासाठी पुन्हा हात पसरावे लागणार

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2018 3:17 PM

पाकिस्तानच्या नव्या संसदेतील सदस्यांनी शपथ घेतली असून 18 ऑगस्ट रोजी इम्रान खान देशाचे पंतप्रधान होतील. त्यांना पदावरती आल्यावर पहिल्याच दिवसापासून देशाच्या तिजोरीची काळजी करायला लागणार आहे.

मुंबई- 14 ऑगस्ट 1947 या दिवशी पाकिस्तान या नव्या देशाची स्थापना झाली. स्वातंत्र्यदिन हा खरेतर देशातल्या सर्व लोकांसाठी आणि नेत्यांसाठी आनंदाचा दिवस असतो. मात्र पाकिस्तानातील वातावरण आनंदाचं नसून चिंतेचं आहे. कारण पाकिस्तानची आर्थिक व्यवस्था अत्यंत नाजूक आहे. पाकिस्तानच्या नव्या संसदेतील सदस्यांनी शपथ घेतली असून 18 ऑगस्ट रोजी इम्रान खान देशाचे पंतप्रधान होतील. त्यांना पदावरती आल्यावर पहिल्याच दिवसापासून देशाच्या तिजोरीची काळजी करायला लागणार आहे.पाकिस्तानकडे सध्या केवळ 10 अब्ज डॉलर इतकेच परकीय चलन शिल्लक असून पुढचे दोनच महिने वस्तू आयात करण्यासाठी त्यांच्याकडे निधी उरला आहे. पाकिस्तानच्या चालू खात्यातील तूट दोन वर्षांमध्ये चौपट झाली असून सर्व भिस्त आयातीवरच आहे. अनेक महत्त्वाच्या वस्तू आयात कराव्या लागल्यामुळे आयातीवर मोठा खर्च करावा लागत आहे. पाकिस्तानने डिसेंबर महिन्यापासून रुपयाचे चारवेळा अवमूल्यन केले आहे त्यामुळे वस्तू आयात करणे अधिकच महाग झाले आहे. दिवाळखोरीच्या उंबरठ्यावरील पाकिस्तानला आता आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे दरवाजे ठोठावण्यापलिकडे कोणताही पर्याय शिल्लक नाही. 1980 नंतर पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडून वारंवार कर्ज घेतलेले आहे.

सध्या पाकिस्तानला वित्तीय तूट भरुन काढण्यासाठी 12 अब्ज डॉलर्सची गरज आहे मात्र पाकिस्तानला 9 अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त निधी मिळू शकणार नाही असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने स्पष्ट केले आहे. अर्थात पाकिस्तानला बेलआऊट पॅकेजद्वारे मदत मिळू शकते. मात्र पाकिस्तान बेल आऊटचे पैसे चीनचे कर्ज भागवण्यासाठी वापरेल अशी शक्यता अमेरिकेने व्यक्त केली आहे.

नाणेनिधीने दार बंद केल्यास पाकिस्तानला सौदी अरेबिया किंवा इतर आखाती देशांकडे हात पसरावे लागतील. किंवा शेवटी चीनकडे जावे लागेल. यंदाच्या जून महिन्यातच चीनने पाकिस्तानला 1 अब्ज डॉलर्सचे कर्ज दिले होते. त्यामुळे पाकिस्तानला चीनचे एकूण 5 अब्ज डॉलर्स परत करायचे आहेत. आता नव्याने कर्ज घेतल्यास अर्थव्यवस्थेवर आणखी ताण येऊ शकतो. म्हणजेच पाकिस्तानला मोठ्या दिवाळखोरीला सामोरे जावे लागणार आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानIndependence Dayस्वातंत्र्य दिवसImran Khanइम्रान खानBudgetअर्थसंकल्प