सीरियातील मशिदीमध्ये चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू; अनेक मुले गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:39 IST2025-01-10T19:37:18+5:302025-01-10T19:39:19+5:30
सीरियातील मशिदीमध्ये चेंगराचेंगरी झाल्याची माहिती समोर आली आहे, या घटनेत तीन महिलांचा मृ्त्यू आणि अनेक मुल जखमी झाले आहेत.

सीरियातील मशिदीमध्ये चेंगराचेंगरी, तीन महिलांचा मृत्यू; अनेक मुले गंभीर जखमी
सीरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सीरियाची राजधानी दमिश्क येथील उमय्यद मशिदीमध्ये शुक्रवारी चेंगराचेंगरी झाली. या घटनेत तीन महिलांचा मृ्त्यू झाला. तर पाच मुल जखमी झाले आहेत. व्हाईट हेल्मेट्सच्या मते, या घटनेदरम्यान मुलांना फ्रॅक्चर, गंभीर दुखापत झाली आणि काही जण बेशुद्ध पडले.
अमेरिकेत अग्नितांडव; लॉस एंजेलिसमध्ये 300 कोटी रुपयांचा बंगला जळून खाक, पाहा व्हिडिओ...
एका नागरिकाने मोठ्या गर्दीत आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान हा अपघात घडला. व्हाईट हेल्मेट्सनी सांगितले की, आमच्या पथकांनी इतर बचाव कर्मचाऱ्यांसोबत एका मुलीला वैद्यकीय मदत पुरवली. मशिदीतून एका महिलेचा मृतदेह आढळून आला.