Three children die in US, mother arrested; An inquiry is underway into the cause of the murder | अमेरिकेत तीन बालके मृतावस्थेत,आई अटकेत; हत्या कशासाठी झाली, याची चौकशी सुरू

अमेरिकेत तीन बालके मृतावस्थेत,आई अटकेत; हत्या कशासाठी झाली, याची चौकशी सुरू

लॉस एंजिलिस (अमेरिका) - येथील एका अपार्टमेंटमध्ये तीन बालके मृतावस्थेत आढळल्यानंतर त्यांच्या आईला अटक करण्यात आली आहे. मृत पावलेली बालके पाच वर्षांपेक्षा कमी वयाची आहेत.
लॉस एंजिलिसचे पोलीस लेफ्टनंट राऊल जोवेल यांनी सांगितले की, बालकांची आजी घरी परतली तेव्हा तिने बालकांचे मृतदेह पाहिले. त्यावेळी त्यांची आई बेपत्ता होती. पोलिसांनी लिलियाना कारिलो (३०) हिला लॉस एंजिलिसपासून ३२२ किलोमीटर अंतरावरील तुलारे काऊंटीमध्ये शनिवारी सकाळी अटक केली. पोलिसांच्या प्राथमिक अंदाजानुसार, बालकांचा मृत्यू चाकूच्या हल्ल्यामुळे झाला असावा. याबाबत चौकशी सुरू करण्यात आली असून, नेमक्या कोणत्या कारणासाठी ही हत्या झाली, याचा शोध घेण्यात येत आहे.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Three children die in US, mother arrested; An inquiry is underway into the cause of the murder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.