रोहिंग्या छावण्यांमध्ये होणार हजारो बालकांचा जन्म, गरोदर महिलांमध्ये बलात्कार पीडितही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2018 14:19 IST2018-05-22T14:13:46+5:302018-05-22T14:19:49+5:30

रोहिंग्यांच्या छावणीमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे.

Thousands of Rohingya rape victims expected to give birth | रोहिंग्या छावण्यांमध्ये होणार हजारो बालकांचा जन्म, गरोदर महिलांमध्ये बलात्कार पीडितही

रोहिंग्या छावण्यांमध्ये होणार हजारो बालकांचा जन्म, गरोदर महिलांमध्ये बलात्कार पीडितही

ढाका- म्यानमारमधील त्रासाला कंटाळून बांगलादेशात आलेल्या रोहिंग्यांच्या समस्या अजूनही सुटलेल्या नाहीत. हजारो रोहिंग्या गर्भवती बांगलादेशातील आश्रय छावण्यांमध्ये प्रसूत होणार आहेत त्यातील बहुसंख्य महिलांवर गेल्या वर्षीच्या अत्याचारांच्या मालिकेत बलात्कार झाले आहेत. ऑगस्ट 2017 पासून 7 लाखांहून अधिक रोहिंग्यांनी म्यानमार सोडून बांगलादेशच्या दिशेने पलायन केले होते. यांमध्ये 81 हजार महिला गरोदर होत्या असे बांगलादेशाच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले असून संयुक्त राष्ट्राच्यामते गरोदर महिला व मुलींची संख्या 40 हजारच्या आसपास असावी.

इस्लामिक रिलिफ कॅनडा या संस्थेच्या संचालक डॉ. फारिहा खान यांनी याबाबत सांगितले, "म्यानमारमध्ये गेल्या वर्षी रोहिंग्यांवर मोठ्या प्रमाणात अत्याचार झाल्या. यामध्ये बहुतांश सर्व महिलांवर शारीरिक, मानसिक व लैंगिक अत्याचाराच्या खुणा आहेत. म्यानमारची सशस्त्र दले रोहिंग्या महिलांना एका रांगेत उभं करत आणि हव्या त्या महिलेवर बलात्कार करत अशा प्रकारे अत्यंत वाईट अत्याचार येथे महिलांवर झाले आहेत."
रोहिंग्या छावणीमधील फातेमा नावाच्या 16 वर्षांच्या मुलीच्या नवऱ्याला या अत्याचारांमध्ये छार मारण्यात आले, त्यानंतर तिच्यावर बलात्कार करण्यात आला. आता ती गर्भवती असून, होणारे बाळ कोणाचे आहे हे सुद्धा तिला माहिती नाही. आपल्यावर ओढवलेल्या प्रसंगाबद्दल बोलताना ती म्हणते," ते जर माझ्या नवऱ्याचे मूल असेल तर ते त्याच्यासारखे दिसेल जर दुसऱ्या कोणाचे असेल तर ते त्या माणसासारखे दिसेल. पण ते माझे बाळ असल्यामुळे मी त्याच्यावर प्रेमच करेन."

संयुक्त राष्ट्राच्या आकडेवारीनुसार बांगलादेशातील रोहिंग्यांच्या छावण्यांमध्ये दररोज 60 बालकांचा जन्म होत आहे. या वर्षभरामध्ये 16 हजार बालकांचा जन्म झाला असून मे आणि जून अखेरपर्यंत आणखी 25 हजार बालकांचा जन्म होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Web Title: Thousands of Rohingya rape victims expected to give birth