PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 15:23 IST2025-09-23T15:22:10+5:302025-09-23T15:23:41+5:30

Giorgia Meloni: पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून इटलीमध्ये आंदोलनाचा भडका उडाला आहे. हजारो पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले असून, हिंसक घटना घडत आहेत.  

Thousands of protesters take to the streets in PM Meloni's Italy, vandalize buses and trains; 60 police injured | PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी

PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी

Giorgia Meloni Protest: पॅलेस्टाईनच्या मुद्द्यावरून इटलीमध्ये हिंसाचार उफाळला आहे. हजारो पॅलेस्टाईन समर्थक रस्त्यावर उतरले असून, ट्रेड युनियनने या आंदोलनाची हाक दिली. या आंदोलनामुळे देशभरातली सार्वजनिक वाहतूक विस्कळीत झाली. आंदोलकांचा हिंसाचार रोखताना पोलिसांची झटापट झाली. यात ६० पेक्षा जास्त पोलीस जखमी झाले आहेत. 

इटलीमधील ८० पेक्षा जास्त शहरांमध्ये या आंदोलनाचे लोण पसरले आहे. रोम, मिलान, नेपल्सपासून अनेक महानगरांमध्ये लोक आंदोलनात सहभागी झाले आहेत. 'फ्री पॅलेस्टाईन', 'सगळं काही थांबवा' अशा घोषणा आंदोलकांनी दिल्या. 

अनेक ठिकाणी रस्ते अडवण्यात आले. पोर्ट बंद करण्यात आले. आंदोलनामुळे इटलीमधील शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे बंद ठेवण्यात आली. अनेक ठिकणी आंदोलनाला हिंसक वळण लागले. पोलीस आणि आंदोलकांमध्ये झडपी झाल्या. या हिंसाचाराचा पंतप्रधान जिजॉर्जियो मेलोनी यांनी निषेध केला आहे. 

आंदोलकांनी मिलान सेंट्रल रेल्वे स्थानकावर तोडफोड केली. खिडक्या फोडल्या. झेंडे जाळण्यात आले. आक्रमक झालेल्या जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराच्या नळकांड्या फोडल्या. पाण्याचा मारा केला. नेपल्स रेल्वे स्थानकावरही आंदोलनक पोलिसांमध्ये झटापट झाली. 

या हिंसक आंदोलनात ६० पेक्षा अधिक पोलीस जखमी झाले आहेत. मिलानमध्ये १० पेक्षा जास्त लोकांना अटक करण्यात आली आहे. इटलीने या महिन्याच्या सुरूवातीलाच संयुक्त राष्ट्र संघामध्ये पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता देण्याच्या बाजूने मतदान केले होते. पण, आता मेलोनींनी वेगळी भूमिका घेतली आहे. पॅलेस्टाईनला स्वतंत्र राष्ट्र मान्यता देण्यास मेलोनींनी विरोध केला आहे.

Web Title: Thousands of protesters take to the streets in PM Meloni's Italy, vandalize buses and trains; 60 police injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.