‘त्या’ चकमकीची हवी न्यायालयीन चौकशी- मजलिस
By Admin | Updated: April 10, 2015 00:46 IST2015-04-10T00:46:52+5:302015-04-10T00:46:52+5:30
तेलंगणात न्यायालयीन कोठडीत ‘सिमी’च्या पाच कथित अतिरेक्यांना चकमकीत ठार मारल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी

‘त्या’ चकमकीची हवी न्यायालयीन चौकशी- मजलिस
अलिगढ : तेलंगणात न्यायालयीन कोठडीत ‘सिमी’च्या पाच कथित अतिरेक्यांना चकमकीत ठार मारल्याची न्यायालयीन चौकशी करण्याची मागणी देशातील मुस्लिम संघटनांची सर्वोच्च संस्था आॅल इंडिया मजलिस-ए-मुशावरतने केली.
तेलंगणातील हे हत्याकांड हाशिमपुरा व बटला हाऊस बनावट चकमकीची आठवण करून देणारे आहे. या कथित अतिरेक्यांना ठार केले गेले तेव्हा त्यांच्या हातात हातकडी होती, अशी माहिती आहे. तेव्हा या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी, अशी मागणी मजलिसचे अध्यक्ष जफरूल इस्लाम यांनी गुरुवारी निवेदनाद्वारे केली.