‘हे लंडन आहे, बोर्ड बंगाली भाषेत नको’, तो फक्त इंग्रजीतच असावा; खासदारानं घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 11, 2025 09:53 IST2025-02-11T09:53:06+5:302025-02-11T09:53:15+5:30
पूर्व लंडनमधील बांगलादेशी समुदायाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व्हाईटचॅपल स्टेशनवर बंगाली भाषेत बोर्ड लावण्यात आला होता

‘हे लंडन आहे, बोर्ड बंगाली भाषेत नको’, तो फक्त इंग्रजीतच असावा; खासदारानं घेतला आक्षेप
लंडन : ग्रेट यारमाउथचे खासदार रुपर्ट लोव यांनी लंडनच्या व्हाईटचॅपल स्टेशनवर बंगाली भाषेत लिहिलेल्या बोर्डवर आक्षेप घेत तो फक्त इंग्रजीतच लिहावा, असे म्हटले. इलॉन मस्क यांनीही या मुद्द्याचे समर्थन केले आहे.
लोव यांनी व्हाईटचॅपल स्टेशनवर इंग्रजी आणि बंगालीमध्ये लिहिलेला बोर्ड दाखवणारा एक फोटो पोस्ट केला आहे. “हे लंडन आहे - स्टेशनचे नावे फक्त इंग्रजीत असावे, इंग्रजीतच!’ असे लोव यांनी म्हटले आहे. लोव यांच्या पोस्टवर सोशल मीडिया यूजर्सनी संमिश्र प्रतिक्रिया दिल्या आहेत. पूर्व लंडनमधील बांगलादेशी समुदायाच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी व्हाईटचॅपल स्टेशनवर बंगाली भाषेत बोर्ड लावण्यात आला होता. येथे बांगलादेशातील लोक मोठ्या संख्येने राहतात.