नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2019 05:32 IST2019-05-09T05:32:30+5:302019-05-09T05:32:49+5:30

पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन मधील न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारला.

 Third time Neerav Modi's bail plead is rejected | नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

नीरव मोदी याचा जामीन तिसऱ्यांदा फेटाळला

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँकेची कोट्यवधींची फसवणूक करणारा फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला ब्रिटन मधील न्यायालयाने बुधवारी जामीन नाकारला. न्यायालयाने त्याला जामीन नाकारण्याची ही तिसरी वेळ आहे. २४ मे पर्यंत
मोदी याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले.
अल्पकाळातच सुनावणी संपवून न्यायाधीशांनी मोदी याच्या जामीन अर्जावर सविस्तर सुनावणी ३० मे रोजी होणार असल्याचे सांगितले. वेस्ट मिन्स्टर न्यायालयात व्हिडीओ लिंकव्दारा मोदी हजर झाला. वँडस्वर्थ कारागृहात तो अनेक दिवसांपासून कैदेत आहे. (वृत्तसंस्था)



 

Web Title:  Third time Neerav Modi's bail plead is rejected