शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
3
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
4
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
5
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
6
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
7
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
8
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
9
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
10
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
11
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
12
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
13
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
14
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
15
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
16
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
17
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
18
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
19
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
20
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 

हे आहेत सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश, ५ मुस्लीम बहुल देशांचाही समावेश; आफ्रिकेतील हिंदू लोकसंख्येनं चकित केलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 17:01 IST

यांपैकी ९५ टक्के हिंदू एकट्या भारतात राहतात. याशिवाय, नेपाळ, मॉरिशसमध्येही मोठ्या संख्येने हिंदू राहतात.

प्रसिद्ध सर्वेक्षण एजन्सी प्यू रिसर्चने नुकतेच धार्मिक लोकसंख्येसंदर्भातील सर्वेक्षण केले. यात, जगामध्ये गेल्या दशकात (२०१० ते २०२०) मुस्लीम लोकसंख्या सर्वाधिक वाढल्याचे समोर आले आहे. तथापि, या सर्वेक्षणात ख्रिश्चन, मुस्लीम आणि धार्मिकदृष्ट्या नास्तिक लोकांनंतर हिंदूंची लोकसंख्या चौथ्या स्थानावर असल्याचे म्हटले आहे. हिंदूंची सर्वाधिक लोकसंख्या आशिया-पॅसिफिक प्रदेशात आहे. येथे संपूर्ण जगातील सुमारे ९९ टक्के हिंदू राहतात. यांपैकी ९५ टक्के हिंदू एकट्या भारतात राहतात. याशिवाय, नेपाळ, मॉरिशसमध्येही मोठ्या संख्येने हिंदू राहतात.

सर्वेक्षण अहवालात असे म्हटले आहे की गेल्या दशकात जगभरात हिंदूंची लोकसंख्या १२ टक्क्यांनी वाढली आहे. अर्थात हिंदूंची लोकसंख्या ११० कोटींवरून १२० कोटींवर पोहोचली आहे. सर्वेक्षण अहवालानुसार, गेल्या दशकात मध्य पूर्व-उत्तर आफ्रिकेत हिंदूंची लोकसंख्या झपाट्याने वाढली आहे. यात ६२ टक्क्यांची वाढ दिसून आली आहे. याचपद्धतीने, उत्तर अमेरिकेत हिंदूंची लोकसंख्या ५५% ने वाढली आहे. याचा अर्थ असा की या भागात हिंदूंची लोकसंख्या इतर धर्मांच्या लोकसंख्येपेक्षा अधिक वाढली आहे.

सर्वाधिक हिंदू लोकसंख्या असलेले टॉप १० देश -या सर्वेक्षणात जगातील टॉप १० हिंदूबहुल लोकसंख्या असलेल्या देशांचाही उल्लेख करण्यात आला आहे. यानुसार, २०२० पर्यंत, भारत आणि नेपाळ या दोन हिंदू बहुल देशांमध्ये सर्वाधिक हिंदूं राहतात. सर्वेक्षणानुसार, जगातील ९४.५% हिंदू भारतात राहतात. देशाच्या लोकसंख्येत यांचा वाटा ७९% एवढा आहे. याचप्रमाणे, नेपाळच्या लोकसंख्येत हिंदूंचा वाटा ८१% आहे. जगाचा विचार करता हा आकडा २% आहे.

बांगलादेश आणि पाकिस्तानचंही नाव -टॉप १० हिंदू लोकसंख्या असलेल्या देशांच्या यादीत, तिसरा क्रमांक लागतो बांगलादेशचा, येथे एकूण लोकसंख्येच्या ७.९ टक्के हिंदू राहतात. चौथ्या क्रमांकावर पाकिस्तान (२.१%), पाचव्या क्रमांकावर इंडोनेशिया (१.४%), सहाव्या क्रमांकावर  श्रीलंका (१४.५%), सातव्या क्रमांकावर अमेरिका, आठव्या क्रमांकावर मलेशिया, नव्या क्रमांकावर यूके आणि दहाव्या क्रमांकावर नंबर लागतो, तो UAE चा. येथील लोकसख्येत हिंदूंचा वाटा 11.8 टक्के एवढा आहे. तर जागतिक पातळीव हिंदूंचा वितार करता, हा आकडा ०.१ टक्क्यांवर जातो. 

टॅग्स :HinduहिंदूMuslimमुस्लीम