शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

"...तर खूप वाईट परिणाम होतील’’, काश्मीर राग आळवत आसिम मुनीरची भारताला पुन्हा धमकी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 10:46 IST

Asim Munir Threatens India: पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे.

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांनी यावर्षी एप्रिल महिन्यात काश्मीरवरून केलेल्या चिथावणीखोर भाषणाची परिणती काश्मीरमधील पहलगाम येथे भीषण दहशतवादी हल्ला होण्यात झाली होती. या हल्ल्यामुळे भारत आणि पाकिस्तानमध्ये तणाव निर्माण झाला होता. तसेच भारतीय सैन्य दलांनी ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवादी अड्ड्यांना लक्ष्य करून या हल्ल्याचा बदला घेतला होता. दरम्यान, आसिम मुनीर यांनी पुन्हा एकदा काश्मीरचा राग आळवला असून, आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे आसिम मुनीर यांनी म्हटले आहे.

याआधी एप्रिल महिन्यात आसिम मुनीर याने काश्मीरवरून प्रक्षोभक भाषण करताना काश्मीर ही पाकिस्तानच्या गळ्याची नस असल्याचा दावा केला होता. आता पाकिस्तानी नौदलाच्या पासिंग आऊट परेडमध्ये मुनीर यांनी पुन्हा एकदा मुक्ताफळे उधळताना  आमच्या शत्रूने जर तणाव वाढवला तर याचे या भागावर खूप वाईट परिणाम होतील आणि याला जबाबदार केवळ आमचा शत्रू असेल, असे म्हटले आहे.

यावेळी आसिम मुनीर याने काश्मीरमधील पाकिस्तानी आणि पाकिस्तान पुरस्कृत दहशतवाद्यांकडून होणाऱ्या कारवायांना काश्मिरी जनतेची लढाई अशी उपमा दिली. ते म्हणाले की, भारताविरोधात लढत असलेल्या आपल्या काश्मिरी बांधवांनी दिलेल्या बलिदानाची आपण आठवण ठेवली पाहिजे. पाकिस्तान हा संयुक्त राष्ट्रांचा प्रस्ताव आणि काश्मिरी लोकांच्या इच्छेनुसार काश्मीर प्रश्नाच्या न्यायपूर्वक तोडग्याचा समर्थक आहे, असा दावाही मुनीर यांनी केला.

दरम्यान, भारताने केलेल्या ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानवर जबर नामुष्की ओढवली होती. मात्र या संघर्षाचा उल्लेख करताना पाकिस्ताने यादरम्यान, संयम आणि परिपक्वता दाखवली असा दावा दावाही मुनीर यांनी केला. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानTerrorismदहशतवादJammu Kashmirजम्मू-काश्मीरPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूर