इराणमध्ये युद्ध सुरू असतानाच, उत्तर कोरियानेअमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या संयुक्त लष्करी सरावावर तेट भाष्य केले आहे. उत्तर कोरियाचे सर्वेसर्वा किम जोंग उन यांची बहीण किम यो जोंग, यांनी अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्या वार्षिक संयुक्त सैन्य अभ्यासावर अथवा युद्ध सरावावर कडक शब्दांत टीक केली आहे. जागतिक सुरक्षेच्या या अत्यंत संवेदनशील काळात, हा सराव प्रादेशिक स्थिरतेला मोठा धोका निर्माण करत असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे म्हटल आहे.
किम जोंग उन यांच्या बहिणीचा थेट इशारा - किम यो जोंग यांनी मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या एका निवेदना म्हटले आहे की, "उत्तर कोरियाच्या सुरक्षेला कोणतेही आव्हान दिल्यास त्याचे 'भयानक परिणाम' भोगावे लागतील. सोमवारपासून अमेरिका आणि दक्षिण कोरियाने ११ दिवसांचा 'फ्रीडम शील्ड' सराव सुरू केला आहे. यात हजारो सैनिक सहभागी झाले आहेत.
इराण युद्धाचा उल्लेख न करता, किम यो जोंग म्हणाल्या, अमेरिका आणि दक्षिण कोरियाचा हा सराव प्रादेशिक स्थिरता बिघडवत आहेत. "जागतिक सुरक्षा व्यवस्था वेगाने कोसळत आहे आणि जगाच्या विविध भागात युद्धे सुरू आहेत. असे असतानाच, हे सर्व या बेपर्वा आणि बदमाश आंतरराष्ट्रीय गुंडांच्या कृत्यांममळे घडत आहे." "फ्रीडम शील्ड" हा अमेरिका आणि दक्षिण कोरियाच्या सैन्याद्वारे दरवर्षी आयोजित केल्या जाणाऱ्या दोन कमांड-पोस्ट सरावांपैकी एक आहे. हा सराव प्रामुख्याने संगणक सिम्युलेशनद्वारे केला जातो. या माध्यमाने दोन्ही देशांच्या संयुक्त युद्धक्षमतेची आणि नव्या सुरक्षा आव्हानांची चाचणी घेतली जाते. याशिवाय, 'वॉरियर शील्ड' नावाचा फील्ड ट्रेनिंग कार्यक्रमही राबवला जातो.
उत्तर कोरियाची आक्रमक भूमिका:आपल्या देशाच्या वाढत्या अणुकार्यक्रमाचा संदर्भ देत किम यो जोंग म्हणाले, "बाह्य धोक्यांविरुद्ध उत्तर कोरिया आपली 'विनाशकारी शक्ती' सातत्याने मजबूत करत राहील. आम्ही आमच्या शत्रूंना युद्ध लढण्याच्या आमच्या क्षमतेसंदर्भात वारंवार खात्री पटवून देत राहू". उत्तर कोरिया या संयुक्त सरावांना नेहमीच 'हल्ल्याची रिहर्सल', असेच म्हणत आला आहे.
Web Summary : Kim Yo Jong warned the US and South Korea against joint military drills. She stated these exercises destabilize the region and threaten North Korea's security, vowing to strengthen its defense capabilities.
Web Summary : किम यो जोंग ने अमेरिका और दक्षिण कोरिया को संयुक्त सैन्य अभ्यास के खिलाफ चेतावनी दी। उन्होंने कहा कि ये अभ्यास क्षेत्र को अस्थिर करते हैं और उत्तर कोरिया की सुरक्षा को खतरा है, और अपनी रक्षा क्षमताओं को मजबूत करने की कसम खाई।