'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2025 17:11 IST2025-05-11T17:08:40+5:302025-05-11T17:11:09+5:30
India Pakistan Tension Update: स्वतःहून शस्त्रसंधीचा प्रस्ताव देऊन ती धुडकावून लावणाऱ्या पाकिस्तानला पंतप्रधान मोदींनी निर्वाणीचा इशारा दिला. अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यासोबत मोदींची चर्चा झाली. त्यावेळी मोदी भारताची भूमिका स्पष्ट केली.

'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
India Pakistan Ceasefire Update: 'पाकिस्तानने जर काही केलं, तर भारताचे उत्तर विनाशकारी आणि कठोर असेल. जसे पाकिस्तानने २६ ठिकाणांना लक्ष्य केल्यानंतर दिले गेले', अशा स्पष्ट शब्दात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला इशारा दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात चर्चा झाली. यावेळी मोदींनी भारताची भूमिका स्पष्ट केली.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
न्यूयॉर्क टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पहिला प्रहार ६-७ मेच्या रात्री केला. भारतीय लष्कराने ऑपरेशन सिंदूर हाती घेत पाकिस्तानातील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले. तेव्हापासून दोन्ही देशातील लष्करी संघर्ष वाढला आहे.
मोदींनी अमेरिकेला काय सांगितलं?
न्यूयॉर्क टाइम्सच्या रिपोर्टनुसार, "पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी व्हान्स यांच्यात चर्चा झाली. यावेळी पंतप्रधान मोदींनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, 'जर पाकिस्तानने काही केलं, तर त्याला विनाशकारी आणि तीव्र उत्तर दिलं जाईल. जसे की पाकिस्तानने भारतातील २६ ठिकाणांवर हल्ला केल्यानंतर दिलं गेलं होतं. भारताने त्यांच्या तळांवरच हल्ले केले", असे मोदी व्हान्स यांच्याशी बोलताना म्हणाले.
वाचा >>'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
पाकिस्तानकडून पहिल्यांदा हल्ला
पहलगाम दहशतवादी हल्ल्यापासूनच पाकिस्तानी लष्कराकडून सीमेवर शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यास सुरूवात झाली. भारताने दहशतवाद्यांची तळे उद्ध्वस्त केल्यानंतर पिसाळलेल्या पाकिस्तानने भारतीय लष्काराची ठिकाणे आणि गावांवरच हवाई हल्ल्याचे प्रयत्न केले.
भारताने पाकिस्तानच्या हवाई तळांना केले लक्ष्य
८-९ मेच्या रात्री पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या आणि हवाई दलाच्या ठिकाणांसह नागरी वस्त्यांवरही हल्ले करण्याचे प्रयत्न केले. ते हाणून पाडल्यानंतर भारतीय लष्कराने मिसाईल आणि लढाई विमानांच्या सहाय्याने पाकिस्तानच्या तीन हवाई तळांवर हल्ले केले. त्याचबरोबर पाकिस्तानच्या शस्त्र भांडारालाही लक्ष्य करण्यात आले.