जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 10:22 IST2025-06-26T10:20:45+5:302025-06-26T10:22:36+5:30

जेफ बेझोस यांनी यापूर्वी लग्नासाठी कॅनारेगिओमध्ये एक जागा निवडली होती; परंतु विरोधानंतर ती बदलण्यात आली.

The world's most expensive wedding, costing a whopping Rs 7,139 crore | जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये

जगातील सर्वांत महागडे लग्न, खर्च तब्बल ७,१३९ कोटी रुपये

न्यूयॉर्क : सर्वांत श्रीमंत उद्योगपतींपैकी एक, ॲमेझॉनचे संस्थापक असलेले ६१ वर्षीय जेफ बेझोस शुक्रवारी ५५ वर्षीय पत्रकार लॉरेन सांचेझसोबत लग्न करणार आहेत. पहिल्या लग्नापासून बेझोस यांना ४ मुले आहेत.

जेफ बेझोस यांनी यापूर्वी लग्नासाठी कॅनारेगिओमध्ये एक जागा निवडली होती; परंतु विरोधानंतर ती बदलण्यात आली. या भव्य लग्नाला जगभरातील २५० व्हीआयपी पाहुणे उपस्थित राहतील. 

या लग्नासाठी ७,१३९ कोटी रुपये खर्च केला जाणार आहे. यातील ७८ कोटी फुलांवर, ७२६ कोटी प्लॅनर्सवर, ७१७ कोटी लग्न स्थळावर आणि ७१३ कोटी सांचेझच्या ड्रेसेसवर केले जाणार आहेत. त्यामुळे हे लग्न जगातील सर्वांत महागडे ठरणार आहे.

या लग्नासाठी इवांका ट्रम्प यांच्यासह हॉलिवूड स्टार लिओनार्डो डिकॅप्रियो, फर्स्टेनबर्ग, किम कार्दशियन, मार्क झुकरबर्ग आणि बिल गेट्सही उपलब्ध राहणार आहेत.

या पाहुण्यांना घेऊन जाण्यासाठी खासगी विमाने रवाना झाली आहेत. या पाहुण्यांसाठी प्रतिष्ठित अमन व्हेनिससह चार लक्झरी हॉटेल्स बुक करण्यात आली आहेत.

Web Title: The world's most expensive wedding, costing a whopping Rs 7,139 crore