मंगळ यानाने टिपला अद्भुत ध्रुवीय प्रकाश; ‘हाेप प्राेब’चे यश

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2022 06:47 AM2022-04-30T06:47:30+5:302022-04-30T06:47:46+5:30

चुंबकीय क्षेत्र आणि साैर हवासंबंधी मिळणार माहिती

The wonderful polar light captured by Mars; The success of the 'Hope Probe' | मंगळ यानाने टिपला अद्भुत ध्रुवीय प्रकाश; ‘हाेप प्राेब’चे यश

मंगळ यानाने टिपला अद्भुत ध्रुवीय प्रकाश; ‘हाेप प्राेब’चे यश

Next

दुबई : मंगळ ग्रह बाबत मानवाला सदैव आकर्षण राहिले आहे. अनेक देशांनी या ग्रहावर जीवसृष्टीच्या शाेधासाठी माेहिमा ही आखल्या. मंगळावर उतरलेल्या अमेरिकेच्या राेव्हर यानाने विविध प्रकारची माहिती नासाला पाठवली. मात्र, आता साैदी अरबच्या ‘हाेप प्राेब’ या यानाने मंगळावर नेत्रदीपक ध्रुवीय प्रकाश किंवा ‘ऑराेरा’ टिपला आहे. यामुळे ग्रहावरील वातावरण, चुंबकीय क्षेत्र आणि साैर हवा संबंधी नवी माहिती मिळण्याची आशा पल्लवित झाली आहे.

ध्रुवीय प्रकाश म्हणजे पृथ्वीवर दिसणाऱ्या प्रकाश किरण सदृश्य किरणे असतात. साैर हालचालींमुळे ग्रहावरील वातावरणावर परिणाम झाल्यास अशी किरणे दिसतात. मंगळावर अशा प्रकारची घटना प्रथमच दिसून आली आहे.  हाेप प्राेबने मंगळावर दाेन प्रकारचा ऑराेरा टिपला आहे. साैर वादळामुळे निर्माण हाेणारा डिफ्युज ऑराेरा आणि चुंबकीय क्षेत्रामुळे दिसणारा डिस्क्रीट ऑराेरा कॅमेरामध्ये दिसून आला आहे. यापैकी दुसऱ्या प्रकारच्या प्रकाशाने ग्रहाचा माेठा भाग व्यापला आहे. ‘ हाेप प्राेब ’ मंगळाच्या कक्षेत २०२१ मध्ये दाखल झाले हाेते. त्याच वेळी यानाने औराेरा टिपला हाेता. तेव्हापासून यावरच लक्ष्य केंद्रित करण्यात आले आहे.

शास्त्रज्ञ म्हणतात...
शास्त्रज्ञांच्या मते, साैर वादळामुळे हा प्रकाश निर्माण झाला आहे.
साेलर विंड इलेक्ट्राॅन्स माेठ्या प्रमाणात ॲक्टिव्ह झाल्यामुळे आकाशात रंगीबेरंगी प्रकाश दिसून आला. 

 

Web Title: The wonderful polar light captured by Mars; The success of the 'Hope Probe'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.