एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2025 13:47 IST2025-08-24T13:41:41+5:302025-08-24T13:47:44+5:30

सारा इझेकिएल यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले...

The power of AI sarah ezekiel voice back after 25 years How did this miracle happen You will be amazed to know | एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!

एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!

आर्टिफिशियल इंटेलिजेंस अर्थात एआयच्या मदतीने अनेक चमत्कार केले गेले आहेत. मात्र ५५ वर्षीय सारा इझेकिएल यांच्यासोबत जे घडले ते खरोखरच एक चमत्कार आहे. एआयच्या मदतीने सारा इझेकिएल यांना २५ वर्षांपूर्वी गमावलेला आपला आवाज परत मिळाला आहे. त्यांना २५ वर्षांपूर्वी मोटर न्यूरॉन आजाराचे निदान झाले. या आजारात मानवी शरीराच्या नसा आणि स्नायू कमकुवत होतात. यामुळे बोलण्यास, गिळण्यास आणि चालण्यासही त्रास होतो. नंतर, हळूहळू आवाजही जातो. सारा यांच्या बाबतीतही असेच घडले. आता कुटुंबाकडे असलेल्या एका आठ सेकंदांच्या जुन्या व्हिडिओ क्लिपचा वापर करून, सारा यांचा आवाज परत आणण्यात आला आहे.

असा घडला चमत्कार -
इंग्लंडमधील उत्तर लंडन येथील सारा यांच्या सापडलेल्या जुन्या क्लिपमध्ये त्या त्यांच्या मुलीशी बोलत होत्या. या क्लिपमधून वैज्ञानिकांनी सारा यांच्या आवाजाचा आठ सेकंदांचा ऑडिओ नमुना घेतला. त्याचा वापर करून एआयला प्रशिक्षण देण्यात आले. याद्वारे, साराच्या आवाजाचा स्वर, पिच आणि बोलण्याची पद्धत कशी होती? हे सांगण्यात आले. या प्रशिक्षणाच्या आधारे, एआय मॉडेलने एक कृत्रिम आवाज विकसित केला. हा आवाज अगदी सारा इझेकिएल यांच्या आवाजासारखाच वाटतो.

आता आपल्या डोळ्याच्या सहाय्याने बोलतात सारा --
आता सारा बोलण्यासाठी एक खास टेक्निकचा वापर करतात. यासाठी, त्या त्यांच्या डोळ्यांच्या सहाय्याने कंप्यूटरवर टाइप करतात. यानंतर, एआय साराने लिहिलेले आपल्या आवाजात बोलते. अशा प्रकारे, सारा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसोबत स्वतःच्या आवाजात बोलू शकतात. यावरून दिसून येते की, एआयद्वारे वैद्यकीय क्षेत्रातही  किती चांगल्या गोष्टी  केल्या जाऊ शकतात.

Web Title: The power of AI sarah ezekiel voice back after 25 years How did this miracle happen You will be amazed to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.