विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 13, 2025 15:56 IST2025-07-13T15:54:30+5:302025-07-13T15:56:55+5:30

पाकिस्तानमधून नेहमी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. आता आणखी एक विचित्र बातमी समोर आली आहे.

The plane was supposed to go to Karachi but how did it reach Saudi Arabia? Questions on Pakistan Airlines | विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा

विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा

पाकिस्तानमधून नेहमी वेगवेगळ्या बातम्या समोर येत असतात. आता आणखी एक विचित्र बातमी समोर आली आहे. पाकिस्तान एअर लाइन्सचा निष्काळजीपणा समोर आला आहे. लाहोरहून कराचीला विमानाने प्रवास करणाऱ्या एका व्यक्तीला पाक एअरलाइन्सच्या विमानाने सौदी अरेबियातील जेद्दाह येथे नेण्यात आल्याचे समोर आले.

'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

या प्रवाशाचे नाव शाहजैन आहे, त्याने लाहोर विमानतळावरून कराचीचे तिकीट काढले होते, पण त्याला चुकीच्या विमानात बसवण्यात आले आणि शाहजैन व्हिसा आणि पासपोर्टशिवाय थेट परदेशात पोहोचला.

चुकीची फ्लाईट कशी पकडली?

शहाजैनला फ्लाईटच्या मध्यभागी हे कळले. काही तासांनंतरही कराची न पोहोचता त्याने केबिन क्रू मेंबरला एक प्रश्न विचारला, त्यानंतर संपूर्ण फ्लाईटमध्ये गोंधळ उडाला. शहाजैनने स्थानिक माध्यमांना सांगितले की, लाहोर विमानतळाच्या डोमेस्टिक टर्मिनलच्या गेटवर २ विमाने उभी होती. मी एअरलाइन कर्मचाऱ्यांना माझे तिकीटही दाखवले. मला कल्पनाही नव्हती की मी चुकीच्या फ्लाइटमध्ये चढत आहे. फ्लाइटमध्ये चढल्यानंतर मी एअर होस्टेसला माझे तिकीटही दाखवले.

उड्डाणादरम्यान विमानात गोंधळ झाला

ज्यावेळी विमान २ तासांच्या उड्डाणानंतरही कराचीला पोहोचले नाही, तेव्हा त्याने केबिन क्रूला विचारले की विमान अद्याप कराचीत का उतरले नाही? यानंतर विमानात गोंधळ झाला. क्रू मेंबर्सनी या चुकीसाठी शाहजहानला दोष देऊ लागले.

पासपोर्ट आणि व्हिसा सुद्धा नव्हता

शाहजैनने सांगितले की,त्यांच्याकडे पासपोर्ट नव्हता आणि सौदी अरेबियाचा व्हिसाही नव्हता. जेद्दाहला पोहोचल्यानंतर, जेव्हा शाहजैनने कराचीला परत पाठवण्याची विनंती केली तेव्हा त्याला सांगण्यात आले की कराचीला पोहोचण्यासाठी २-३ दिवस लागतील. शाहजैनने म्हटले आहे की तो पाकिस्तान एअरलाइन्सविरुद्ध कायदेशीर कारवाई करणार आहे.

पाकिस्तान विमानतळ प्राधिकरणाने लाहोर विमानतळ अधिकाऱ्यांना या घटनेबद्दल विचारपूस केली. पीएएने याला एअरलाइनचा "निष्काळजीपणा" म्हटले आहे. लाहोर विमानतळ प्रशासनानेही चौकशीचे आदेश दिले आहेत. 

Web Title: The plane was supposed to go to Karachi but how did it reach Saudi Arabia? Questions on Pakistan Airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.