हजारो फूटांवर विमान होतं, अचानक वैमानिक कॉकपिटमध्ये पडला; ग्रीसमध्ये प्लेनचे आपत्कालीन लँडिंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 12:07 IST2025-02-10T12:02:47+5:302025-02-10T12:07:37+5:30

ग्रीसमध्ये एक विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आले आहे.

The plane was at thousands of feet, suddenly the pilot fell into the cockpit; the plane made an emergency landing in Greece | हजारो फूटांवर विमान होतं, अचानक वैमानिक कॉकपिटमध्ये पडला; ग्रीसमध्ये प्लेनचे आपत्कालीन लँडिंग

हजारो फूटांवर विमान होतं, अचानक वैमानिक कॉकपिटमध्ये पडला; ग्रीसमध्ये प्लेनचे आपत्कालीन लँडिंग

ग्रीसमधील एथेंसमध्ये एका विमानाचं आपत्कालीन लँडिंग करण्यात आलं आहे.  हे विमान मँचेस्टरसाठी निघाले होते. वैमानिक कॉकपिटमध्ये पडला आणि त्यांचे नियंत्रण सुटले. यामुळे लँडिंग करावे लागले. 

कॉकपिटमध्ये पायलट अचानक पडला. यामुळे विमानात गोंधळ उडाला. विमानातील केबिन क्रू त्यांच्या पेयांच्या गाड्या सोडून वैद्यकीय मदतीसाठी ओरडत कॉकपिटकडे धावत गेल्या,यावेळी असताना विमानात गोंधळ उडाला. केबिन क्रूने ताबडतोब पायलटभोवती स्क्रीन लावली, ते गंभीर स्थितीत होते. यानंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग करणे आवश्यक होते.

यानंतर दुसऱ्या पायलटने परिस्थिती लक्षात घेऊन विमानाचा ताबा घेतला. सह-वैमानिकाने हुशारीने विमान अथेन्स विमानतळावर उतरवले, तिथे जखमी वैमानिकाला त्वरित वैद्यकीय मदत देण्यासाठी पॅरामेडिक्स आणि आपत्कालीन वाहने येऊन थांबली होती. विमानातील प्रवाशांनी सह-वैमानिकाच्या शौर्यपूर्ण प्रयत्नांचे कौतुक केले आणि टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे स्वागत केले.

एका प्रवाशाने सांगितले की "विमानात ओरडण्याशिवाय कोणताही आवाज येत नव्हता. सुरुवातीला आम्हाला वाटले की एखादा प्रवासी जखमी झाला आहे. नंतर केबिन क्रूने प्रवाशांना विचारले की कोणी वैद्यकीयदृष्ट्या प्रशिक्षित आहे का, त्यानंतर काही प्रवासी उठले आणि केबिन क्रूला मदत केली."

यानंतर केबिन क्रुने पायलटची तब्येत बिघडल्याची माहिती दिली.  त्यांना वैद्यकीय मदतीची आवश्यकता आहे असं सांगितले. तेव्हा प्रवाशांना कळले की जखमी झालेला प्रवासी नाही तर विमानाचा पायलट आहे, तेव्हा लोक काळजीत पडले.

विमानाच्या आपत्कालीन लँडिंगनंतर, प्रवाशांना हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था करण्यात आली आणि ९ फेब्रुवारी रोजी परतीच्या फ्लाइट पुन्हा बुक करण्यात आल्या. 

Web Title: The plane was at thousands of feet, suddenly the pilot fell into the cockpit; the plane made an emergency landing in Greece

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :airplaneविमान