हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 15:12 IST2025-07-31T15:12:24+5:302025-07-31T15:12:55+5:30

नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम विमानतळावरून संध्याकाळच्या सुमारास उड्डाण करणारं डेल्टा एअरलाइन्सचं विमान मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच ...

The plane started shaking in the air, the lives of the passengers were in danger, the crew members were trembling, finally... | हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

हवेतच हेलकावे खाऊ लागले विमान, प्रवाशांचे प्राण संकटात, कर्मचाऱ्यांचा उडाला थरकाप, अखेर...

नेदरलँडमधील अॅमस्टरडॅम विमानतळावरून संध्याकाळच्या सुमारास उड्डाण करणारं डेल्टा एअरलाइन्सचं विमान मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावले. विमानाने उड्डाण केल्यानंतर काही वेळातच विमानाच्या डोप्लर रडार स्क्रिनवर गडद तांबड्या रंगाचे ठिपके दिसू लागले होते. हे ठिपके म्हणजे पुढे असलेल्या एअर टर्ब्युलन्सचे संकेत होते. त्यानंतर काही वेळातच हे विमान एअर टर्ब्युलन्सच्या क्षेत्रात पोहोचले. वैमानिकाने प्रवासी आणि कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. तसेच सीटबेल्ट बांधून जागेवरच बसण्याची सूचना दिली. काही वेळातच विमान मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असलेल्या क्षेत्रात पोहोचले. मात्र या टर्ब्युलन्सचा प्रभाव एवढा प्रचंड होता की, त्यामुळे केबिनमध्ये सामान प्रवाशांच्या डोक्यावर पडू लागले. समोरची बिकट परिस्थिती पाहून विमानातील कर्मचाऱ्यांच्याही तोंडचं पाणी पळालं.

विमानातील बिघडलेली परिस्थती पाहून वैमानिकाने प्रसंगावधान राखत सीमेलगतच्या मिनियापोलिस-सेंट पॉल इंटरनॅशनल एअरपोर्टच्या एटीसीसोबत संपर्क साधला. त्यानंतर एटीसीकडून परवानगी मिळाल्यानंतर विमानाला मिनियापोलीस-सेंट पॉल इंटरनॅशलन एअरपोर्टच्या दिशेने वळवण्यात आले. हे विमान रात्री ७.४५ वाजता सुखरूपरीत्या उतरवण्यात आले. 

यादरम्यान, विमानातील २५ प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तर उर्वरित प्रवाशांना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अॅमस्टरडॅम येथे पाठवण्यात आले.  

Web Title: The plane started shaking in the air, the lives of the passengers were in danger, the crew members were trembling, finally...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.