ईश्वराने सांगितले म्हणत आईने केली दोन मुलांची हत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 10:05 IST2023-08-02T10:05:36+5:302023-08-02T10:05:56+5:30
जगाचा अंत जवळ येत आहे, त्यामुळे मला माझा मुलगा आणि मुलीला सुरक्षित ठेवायचे होते. आता ते दोघे स्वर्गात आहेत. मी त्यांच्याशी सतत बोलत राहते.

ईश्वराने सांगितले म्हणत आईने केली दोन मुलांची हत्या
न्यूयॉर्क : अमेरिकेतील इडाहो शहरात एका आईने आपल्याच दोन मुलांची हत्या केली. याप्रकरणात ती दोषी आढळली असून, तिला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.
जगाचा अंत जवळ येत आहे, त्यामुळे मला माझा मुलगा आणि मुलीला सुरक्षित ठेवायचे होते. आता ते दोघे स्वर्गात आहेत. मी त्यांच्याशी सतत बोलत राहते. ईश्वराने मला तसे करण्याची आज्ञा दिली होती, असे महिलेने याचिकेत म्हटले आहे.
लोरी वेलो डेबेल असे या महिलेचे नाव आहे. महिलेने तिची १६ वर्षांची मुलगी टायली रायन आणि ७ वर्षांचा मुलगा जोशुआ डेबेल यांची हत्या केली. महिलेला तिच्या पतीची माजी पत्नी टॅमी डेबेल हिच्या हत्येचा कट रचल्याबद्दलही दोषी ठरवण्यात आले.