जलावतरणापूर्वीच महाकाय जहाज उलटलं, जगासमोर हसं झालं, आता किम जोंगने दोषींना केली कठोर शिक्षा, चार अटकेत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2025 14:35 IST2025-05-27T14:35:18+5:302025-05-27T14:35:42+5:30
North Korea: गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने तयार केलेलं महाकाय लढाऊ जहाज जलावतरण करत असतानाच पाण्यात कलंडलं होतं. या घटनेमुळे जगभरात उत्तर कोरियाचं हसं झालं होतं. तसेच हुकूमशाह किम जोंग उनवर मोठी नामुष्की ओढवली होती.

जलावतरणापूर्वीच महाकाय जहाज उलटलं, जगासमोर हसं झालं, आता किम जोंगने दोषींना केली कठोर शिक्षा, चार अटकेत
गेल्या आठवड्यात उत्तर कोरियाने तयार केलेलं महाकाय लढाऊ जहाज जलावतरण करत असतानाच पाण्यात कलंडलं होतं. या घटनेमुळे जगभरात उत्तर कोरियाचं हसं झालं होतं. तसेच हुकूमशाह किम जोंग उनवर मोठी नामुष्की ओढवली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या किंग जोन उन याने या घटनेसाठी जबाबदार असलेल्या दोषींना कठोर शिक्षा देण्याच्या दिशेनं पावलं टाकली असून, या प्रकरणी चार बड्या अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोंमध्ये हे जहाज एका बाजूला कलंडलेलं दिसत आहे. तसेच ओढवलेली नामुष्की लपवण्यासाठी हे जहाज मोठा कपडा टाकून झाकण्यात आलं आहे. टोकाचा हलगर्जीपणा आणि अनुभवहीन कमांडमुळे हा प्रकार घडल्याचं उत्तर कोरियामधील सरकारी वृत्तपत्र रोडोंग सिनमुनने म्हटलं आहे. तर किम जोंग उनने या प्रकाराची तुलना देशावर झालेल्या हल्ल्याशी केली आहे.
या प्रकरणी उत्तर कोरियामधील चार बड्या अधिकाऱ्यांना किम जोंग उनच्या रोषाला सामोरं जावं लागलं आहे. त्यामध्ये री ह्यांग सॉन, कांग जोंग चोल, हान क्याँग हाक आणि किम योंग हाक यांचा समावेश आहे. या चौघांनाही ताब्यात घेण्यात आलं असून, त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी प्रत्येक चुकीचा हिशोब होईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही, असे किम जोंग उनने म्हटलं आहे.