महिला शिक्षिकेने सर्व मर्यादा ओलांडल्या; शाळेच्या मैदानातच विद्यार्थ्यासोबत केला सेक्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2024 15:30 IST2024-01-11T15:28:54+5:302024-01-11T15:30:41+5:30

या प्रकरणाची शाळेच्या मुख्याध्यापकांसह इतर व्यक्तींनाही कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे.

The female teacher Had sex with a student in the school grounds | महिला शिक्षिकेने सर्व मर्यादा ओलांडल्या; शाळेच्या मैदानातच विद्यार्थ्यासोबत केला सेक्स

महिला शिक्षिकेने सर्व मर्यादा ओलांडल्या; शाळेच्या मैदानातच विद्यार्थ्यासोबत केला सेक्स

महिला शिक्षिकेने शाळेच्या मैदानात एका विद्यार्थ्यासोबत शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याची घटना अमेरिकेत घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आहे. द 'इंडिपेन्डंट'ने याबाबतचे वृत्त दिले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पुलास्की काउंटीमधील लॅकी महाविद्यालयातील गणिताची शिक्षिका असलेल्या हेली क्लिफ्टन-कारमॅक हिला पोलिसांनी ५ जानेवारी रोजी अटक केली. बलात्कार, विद्यार्थ्याशी लैंगिक संपर्क आणि विनयभंग केल्याच्या आरोपाखाली या शिक्षिकेला अटक करण्यात आली. शिक्षिकेने ज्या विद्यार्थ्याशी लैंगिक संबंध ठेवले त्यानेच पोलिसांना याबाबतची माहिती दिली आहे.

 हेली क्लिफ्टन-कारमॅक ही ज्या महाविद्यालयात शिक्षिका म्हणून काम करत होती, तेथीलच एका अल्पवयीन तरुणाशी तिने लैंगिक संबंध प्रस्थापित केले. काही दिवसांपूर्वी तर शाळेतील इतर विद्यार्थ्यांना नजर ठेवायला लावून तिने शाळेच्या मैदानातच १६ वर्षीय मुलाशी सेक्स केला. ती सर्वच विद्यार्थ्यांशी फार जवळीक साधत असे, असं सदर तरुणाने पोलिसांना सांगितलं आहे. तसंच या प्रकरणाची शाळेच्या मुख्याध्यापकांसह इतर व्यक्तींनाही कल्पना असल्याचा दावा करण्यात आला आहे.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी आरोपी शिक्षिकेला अटक केली आणि नंतर तपास करण्यासाठी तिचा फोन ताब्यात घेतला. मात्र सदर शिक्षिका आपल्या फोनचा पासवर्ड द्यायला तयार नव्हती. अखेर पोलिसांनी तंत्रज्ञानाचा वापर करत तिचा फोन अनलॉक केला. त्यावेळी फोनमध्ये शिक्षिका आणि विद्यार्थ्यामध्ये झालेली चॅटिंग आढळून आली. या चॅटिंगमधून शिक्षिकेचे विद्यार्थ्यासोबत असलेले संबंध उघड झाल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली असून अधिक तपास केला जात आहे.

Web Title: The female teacher Had sex with a student in the school grounds