कॅमेऱ्यासमोर येऊन वारंवार करत होता टिवल्या बावल्या,महिला रिपोर्टरने असा शिकवला धडा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 7, 2023 18:14 IST2023-06-07T18:12:39+5:302023-06-07T18:14:12+5:30
Jara Hatke News: एक फॅन लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान, महिला रिपोर्टरच्या मागे लागला. कॅमेऱ्यासमोर टिवल्याबावल्या करू लागला. मग या रिपोर्टरने त्याला आपल्या पद्धतीने धडा शिकवला.

कॅमेऱ्यासमोर येऊन वारंवार करत होता टिवल्या बावल्या,महिला रिपोर्टरने असा शिकवला धडा
अनेकदा चित्रपट कलाकारांना सार्वजनिक ठिकाणी चाहत्यांच्या गऱ्हाड्याचा त्रास सहन करावा लागतो. तसेच काही प्रसिद्ध न्यूज अँकर्सची फॅन फॉलोविंगही मोठी असते. या लोकांनाही त्यांच्या फॅन्समुळे कधी कधी रिपोर्टिंग करताना अडचणींचा सामना करावा लागतो. हल्लीच एक असा प्रकार समोर आला ज्यात एक फॅन लाईव्ह रिपोर्टिंगदरम्यान, महिला रिपोर्टरच्या मागे लागला. कॅमेऱ्यासमोर टिवल्याबावल्या करू लागला. मग या रिपोर्टरने त्याला आपल्या पद्धतीने धडा शिकवला.
हा तरुण कॅमेऱ्यासमोर टिवल्या बावल्या करत असताना महिला रिपोर्टरने अगदी हसतमुखपणे सर्व प्रकरण हाताळले. हा व्हिडीओ आता मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ मियामीमधील रिपोर्टर समांथा रिवेरे हिचा आहे. या व्हिडीओमध्ये ती लाईव्ह रिपोर्टिंग करत आहे. तर तिचा एक फॅन कॅमेऱ्यासमोर येण्याचा प्रयत्न करत आहे.
लास वेगासमध्ये ती आइस हॉकीमध्ये वेगास गोल्डन नाइट्सच्या द फ्लोरिडा पँथर्सवर विजयाबाबतचं रिपोर्टिंग करत होती. त्यावेळी तिला विचलित करत असलेल्या एका फॅनला ती हाताने धक्का देऊन कॅमेऱ्याच्या फ्रेममधून बाजूला करत होती.
मात्र या संपूर्ण व्हिडीओमध्ये समंथाचा संयम कुठेही तुटला नाही. ती धैर्याने हसत हसत रिपोर्टिंग करत आहे. खूप राग आला तरी तिने रागावर नियंत्रण ठेवून लाईव्ह रिपोर्टिंगवर लक्ष दिलं. आता हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक समंथाचं कौतुक करत आहेत. तर अनेक लोकांनी महिला रिपोर्टरसोबत टिवल्या बावल्या करणाऱ्या व्यक्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे.