थायलंडच्या राष्ट्रीय ध्वजाचा रंग असलेल्या माशाची 53 डॉलरला विक्री

By Admin | Updated: November 17, 2016 17:36 IST2016-11-17T17:09:58+5:302016-11-17T17:36:16+5:30

थायलंडच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाशी मिळता-जुळता असलेल्या एका माशाची 53 डॉलरला ऑनलाइन विक्री करण्यात आली आहे. विक्री करण्यात आलेला माशा हा सयामीज

Thailand's national flag-colored fish sells for $ 53 | थायलंडच्या राष्ट्रीय ध्वजाचा रंग असलेल्या माशाची 53 डॉलरला विक्री

थायलंडच्या राष्ट्रीय ध्वजाचा रंग असलेल्या माशाची 53 डॉलरला विक्री

ऑनलाइन लोकमत
बॅंकॉंक, दि. 17 - थायलंडच्या राष्ट्रीय ध्वजाच्या रंगाशी मिळता-जुळता असलेल्या एका माशाची 53 डॉलरला ऑनलाइन विक्री करण्यात आली आहे. विक्री करण्यात आलेला माशा हा सयामीज फाइटिंग जातीचा आहे. त्याचा रंग निळा, लाल आणि पांढरे पट्टे असा समिश्र असून या माशाचा रंगही येथील राष्ट्रीय ध्वजासारखाच आहे.
मच्छीमार काचेन वोराचाय याने सोशल नेटवर्किंग साइट्सवर सयामीज फाइटिंग माशासोबतच आणखी काही जातीच्या माशांचे फोटो शेअर केले होते. त्यानंतर त्याने फेसबुकवर खासगी लिलाव करणा-या एका ग्रुपवर या माशांचे फोटो विक्रीसाठी पोस्ट केले. यावेळी या लिलावात सयामीज फाइटिंग माशाला सर्वाधिक जास्त बोली लावण्यात आली.या माशाची सुरुवातीची किंमत 2.792 डॉलर लावण्यात आली होती. त्यानंतर दुस-या दिवशी  53 डॉलर विक्री करण्यात आली.
सयामीज फाइटिंग माशाला एवढी मोठी किंमत येईल असा विचार सुद्धा केला नव्हता. लिलावाच्या दुस-या दिवशी  53 डॉलर इतकी बोली लागल्याचे पाहून मला आश्चर्याचा धक्काच बसला, असे मच्छीमार काचेन वोराचाय याने सांगितले. 
 

 

Web Title: Thailand's national flag-colored fish sells for $ 53

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.