टेक्सासमध्ये महिलेने दिला 6 बाळांना जन्म

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2019 11:18 IST2019-03-17T10:26:21+5:302019-03-17T11:18:57+5:30

टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाचवेळी सहा बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. 

texas women give birth to six children | टेक्सासमध्ये महिलेने दिला 6 बाळांना जन्म

टेक्सासमध्ये महिलेने दिला 6 बाळांना जन्म

ठळक मुद्देटेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाचवेळी सहा बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली.अमेरिकेतील 'द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास' मध्ये एका महिलेने सहा बाळांना जन्म दिला आहे. 'थेलमा चैका असं या महिलेचं नाव असून त्यांनी  15 मार्च रोजी बाळांना जन्म दिला.

ह्यूस्टन - गरोदर महिलेने चार मुलांना जन्म देण्याची घटना याआधी समोर आली आहे. मात्र टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये एका महिलेने एकाचवेळी सहा बाळांना जन्म दिल्याची आश्चर्यकारक घटना घडली आहे. 

डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकेतील 'द वुमेन्स हॉस्पिटल ऑफ टेक्सास' मध्ये एका महिलेने सहा बाळांना जन्म दिला आहे. 'थेलमा चैका असं या महिलेचं नाव असून त्यांनी  15 मार्च रोजी सहा बाळांना जन्म दिला आहे. यामध्ये चार मुलं आणि दोन मुलींचा समावेश आहे. या सहा बाळांची प्रकृती उत्तम असून थेलमा याची प्रकृती देखील उत्तम असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

जगभरात 4.7 अब्ज महिलांमध्ये अशी एखादीच महिला असते जी एकाचवेळी 6 मुलांना जन्म देते अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. सहा बाळांना रुग्णालयातील एनआयसीयूमध्ये ठेवले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. थेलमा यांनी जीना आणि जुरियल अशी आपल्या मुलींची नावे  ठेवली आहेत. मात्र चार मुलांची नावं काय ठेवायची यावर सध्या त्या विचार करत आहे. 

Web Title: texas women give birth to six children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.