Texas School Firing: नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2022 11:03 IST2022-05-25T10:57:26+5:302022-05-25T11:03:09+5:30
Texas School Firing: अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले.

Texas School Firing: नियतीचा क्रूर खेळ; शाळेच्या बक्षीस समारंभातील आई-मुलाची भेट ठरली शेवटची!
अमेरिकेच्या टेक्सासमध्ये एका शाळेमध्ये मोठी घटना घडली. भीषण गोळीबारात १८ विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून अनेक विद्यार्थी जखमी झाले. या गोळीबारात तीन शिक्षकांचाही मृत्यू झाल्याची माहिती समोर आली. टेक्सासच्या राज्यपालांनीदेखील याला दुजोरा दिला. दरम्यान, या घटनेत नियतीचा क्रूर खेळही दिसून आला. शाळेच्या बक्षीस समारंभात झालेली आई आणि मुलाची भेट ही अखेरची ठरली. या घटनेत १० वर्षाच्या झेविअर लोपेझ या चिमुरड्याचा मृत्यू झाला.
टेक्सासमध्ये एका शाळेत झालेल्या गोळीबाराच्या घटनेत १० वर्षीय झेविअर लोपेझ याचा मृत्यू झाल्याची माहिती एबीसी न्यूजनं त्याच्या कुटुंबीयांच्या हवाल्यानं दिली आहे. झेविअर हा चौथ्या ग्रेडमध्ये शिक्षण घेत होता. या गोळीबाराच्या काही तासांपूर्वीच झेविअर आणि त्याच्या आईची एका बक्षीस समारंभात भेट झाली होती. परंतु ही त्यांची अखेरची भेट ठरेल आणि त्या त्याला अखेरचं पाहतील असं बिलकूल वाटलं नव्हतं अशी प्रतिक्रिया झेविअरच्या कुटुंबीयांकडून देण्यात आली.
#UPDATE | Texas school shooting death toll rises to 18 children, 3 adults, as per Texas state senator: AFP
— ANI (@ANI) May 25, 2022
१८ वर्षीय तरुणाकडून गोळीबार
एका १८ वर्षीय तरुणाने हा गोळीबार केला. त्यानंतर त्यानं स्वत:वरही गोळी झाडली. दुपारच्यावेळेस ही घटना घडल्याची माहिती समोर आली. पोलिसांना माहिती मिळताच तातडीने फोर्स तिथे पाठविण्यात आली. परंतु तोवर उशिर झाला होता. २०१२ मध्ये सँडी हुक प्राथमिक विद्यालयात देखील असाच गोळीबार झाला होता. यामध्ये २० मुलांचा मृत्यू झाला होता. याच्यासारखीच परंतु त्यापेक्षा जास्त भयानक असा हा हल्ला असल्याचं टेक्सासचे राज्यपाल ग्रेग अॅबॉट यांनी सांगितलं. आरोपीने दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या ग्रेडमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांवर गोळीबार केला.