शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

"भारत, तुम्हारी मौत...!; 20 वर्षांनंतर दहशतवादी अझहरचं भाषण, पंतप्रधान मोदी अन् नेतन्याहू यांच्याबद्दल ओकली गरळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2024 19:27 IST

Narendra modi and benjamin netnahu : दहशतवादी अझहर मसूद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासंदर्भात  बोलताना म्हणाला, "मला लाज वाटते की, मोदींसारखा कमकुवत माणूस आपल्याला आव्हान देतो अथवा नेतान्याहूसारखा उंदीर आपल्याला आव्हान देतो.

जगभरात दहशतवाद पसरवण्यासाठी कुख्यात असलेल्या पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरख्या असलेल्या मसूद अझहरने 20 वर्षांनंतर पहिल्यांदाच भाषण देत भारत आणि इस्रायलच्या पंतप्रधानांविरोधात गरळ ओकली आहे. त्याने दोन्ही देशांविरोधात नव्याने जिहादी छेडण्याची शपथ घेतली आहे. मात्र, मसूद अझहरने हे भाषण केव्हा आणि कुठे दिले, यासंदर्भात जैश-ए-मोहम्मदने माहिती दिलेली नाही. पण मसूदचा हा उघड्यावरील व्हिडिओ समोर आल्याने पाकिस्तानची पोलखोल झाली आहे. जैश ए मोहम्मद आपले विचार जगभरात पोहोचवण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म देखील चलाते, यावरच मसूदचा हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे.

'द प्रिंट'ने दिलेल्या वृत्तानुसार, एका भारतीय इंटेलिजन्स अधिकाऱ्याने म्हटले आहे की, हे भाषण शक्यतो गेल्या महिन्याच्या अखेरीस पाकिस्तानातील बहावलपूरच्या बाहेर हजार एकरात पसरलेल्या उम्म-उल-कुरा मदरसा आणि मशीद परिसरात देण्यात आले आहे. येथे प्रशासकीय ब्लॉक आणि अनेक निवासी ब्लॉकही आहेत. भाषणादरम्यान अझहरने लोकांना दहशतवादी संघटनेत सामील होण्यासही सांगितले. यानंतर तेथे उपस्थित दहशतवाद्यांनी टाळ्या वाजवून त्याचे कौतुक केले. यावेळी मसूद वेळोवेळी 'भारत तेरी मौत आ रही है' अशा घोषणा देत राहिला.

पंतप्रधान मोदी आणि नेतन्याहू यांच्याबद्दलही ओकली गरळ -दहशतवादी अझहर मसूद भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यासंदर्भात  बोलताना म्हणाला, "मला लाज वाटते की, मोदींसारखा कमकुवत माणूस आपल्याला आव्हान देतो अथवा नेतान्याहूसारखा उंदीर आपल्याला आव्हान देतो. मला सांगा, माझी बाबरी मशीद परत मिळवण्यासाठी 300 लोकही नाहीत का?" भारताला धमकावत दहशतवादी मसूद पुढे म्हणाला, आम्ही तुम्हा सर्वांना अशा शक्तिशाली बंदुकांसह काश्मिरात पाठवू की, सर्व टेलिव्हिजन अँकरही हादरतील आणि ही शस्त्रे कुठून आली? असे विचारतील. 

टॅग्स :TerrorismदहशतवादterroristदहशतवादीNarendra Dabholkarनरेंद्र दाभोलकर