ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला, ३४ ठार

By admin | Published: March 22, 2016 01:10 PM2016-03-22T13:10:19+5:302016-03-22T19:14:39+5:30

बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याने हादरले. ब्रसेल्समधील झॅव्हनटेम विमानतळवरील डिपार्चर हॉलच्या भागात मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले.

A terrorist attack in Brussels, 34 killed | ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला, ३४ ठार

ब्रसेल्समध्ये दहशतवादी हल्ला, ३४ ठार

Next

 ऑनलाइन लोकमत

ब्रसेल्स, दि. २२ - बेल्जियमची राजधानी ब्रसेल्स शहर मंगळवारी दहशतवादी हल्ल्याने हादरले. ब्रसेल्समधील झॅव्हनटेम विमानतळवरील डिपार्चर हॉलच्या भागात मंगळवारी सकाळी दोन बॉम्बस्फोट झाले. त्यानंतर मालबीक मेट्रो स्थानकावर स्फोट झाला.  या स्फोटामध्ये ३४जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत. 

आरटीबीएफच्या वृत्तानुसार सकाळी आठच्या सुमारास हे स्फोट झाले. ब्रसेल्स विमातनळावरील बॉम्बस्फोट हा आत्मघातकी हल्ला असल्याचे बेल्जियमच्या सरकारी वाहिनीने म्हटले आहे. नोव्हेंबरमध्ये पॅरिसवर झालेल्या हल्ल्यातील मुख्य संशयित सालाह अबडेस्लामला ब्रसेल्समध्ये अटक झाल्यानंतर चारच दिवसांनी हा स्फोट झाला आहे. 
 
या घटनेनंतर बेल्जियममधील सुरक्षा यंत्रणा सर्तक आणि सज्ज झाल्या आहेत. विमानतळावर स्फोट झाल्यानंतर थोडयाचवेळात मेट्रो स्थानकाजवळ बॉम्बस्फोट झाला. मेट्रोचे संचालन करणा-या एसटीआयबीने मेट्रो बंद केल्याची माहिती दिली आहे. 
 
ब्रसेल्स विमानतळावरील स्फोटात कुठल्याही भारतीय व्यक्तिची जिवीतहानी झाली नसल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते विकास स्वरुप यांनी दिली. जेट एअरवेजनेही पत्रक प्रसिध्द करुन सर्व क्रू सदस्य सुखरुप असल्याची माहिती दिली. 
 
अभिनेत्री गुल पनागचा नवराही क्रू सदस्यांमध्ये आहे. गायक अभिजीतची पत्नी आणि मुलगाही स्फोट झाला त्यावेळी ब्रसेल्स विमानतळावर होते. मात्र ते सुरक्षित असल्याची माहिती त्याने टि्वट करुन दिली. सर्वप्रथम सोशल मिडीयावर प्रसिध्द झालेल्या छायाचित्रांनुसार विमानतळावरील टर्मिनल इमारतीमधून धूर येत होता. 
 
बेल्जियम प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार विमानतळ रिकामी करण्यात आला असून, विमानतळावरील उड्डाणे थांबवण्यात आली आहेत.खबरदारी म्हणून शहरातील रेल्वे वाहतूकही बंद करण्यात आली आहे. सोशल मिडीयाच्या वृत्तानुसार विमानतळावरील नागरीक घाबरलेले असून, विमानतळापासून दूर पळत आहेत. 
स्फोटानंतर इमारतीच्या काचाही फुटल्या आहेत. स्काय न्यूजच्या अॅलेक्स रॉसी स्फोट झाला त्यावेळी तिथे होता. त्याने सांगितले कि, मी दोन मोठया स्फोटाचे आवाज ऐकले. बिल्डीग हल्ल्यासारखी मला वाटले. स्फोटानंतर धुऴ आणि धूराचा लोट बाहेर येताना दिसला. 
 
स्फोटाचा आवाज झाला त्यादिशेने मी गेलो तेव्हा लोक तिथून बाहेर पळत होते. त्यांच्या चेह-यावर भितीचे भाव होते. दरम्यान इंग्लंडचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनी या स्फोटांमुळे धक्का बसल्याचे सांगत दु:ख व्यक्त केले असून बचावकार्यासाठी सर्वतोपरी मदत करण्यास सज्ज असल्याचे नमूद केले आहे.
 
 
 
 
 
 

Web Title: A terrorist attack in Brussels, 34 killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.