हल्लेखोरांचा खात्मा
By Admin | Updated: January 10, 2015 02:27 IST2015-01-10T02:27:41+5:302015-01-10T02:27:41+5:30
चार्ली हेब्डो साप्ताहिकावर भीषण हल्ला चढवून १२ जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही हल्लेखोर भावंडांचा फ्रान्स पोलिसांनी खात्मा केला आहे.

हल्लेखोरांचा खात्मा
थरारक ओलीस नाट्य संपुष्टात : पॅरिसने सोडला सुटकेचा श्वास
पॅरिस : चार्ली हेब्डो साप्ताहिकावर भीषण हल्ला चढवून १२ जणांचा बळी घेणाऱ्या दोन्ही हल्लेखोर भावंडांचा फ्रान्स पोलिसांनी खात्मा केला आहे. बुधवारपासून सुरू असलेल्या या तणावाच्या वातावरणातून पॅरिसवासियांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
चार्ली हेब्डोवरील भयानक हल्ला आणि त्यानंतर या हल्लेखोरांनी स्वत:च्या बचावासाठी निरपराध लोकांना ओलीस ठेवल्याने पॅरिस हादरले होते. फ्रान्स पोलिसांसह विशेष पथके सलग
तीन दिवसांपासून या हल्लोखोरांच्या मागावर होते.
फ्रेंच सुरक्षा दलाने शहर बंद करून पॅरिसवासी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी कारवाई हाती घेतली. शुक्रवारी दुपारी दामित्रिन-एन-गोईल उपनगरातील एका प्रिटिंग प्रेसची इमारत स्फोट आणि गोळीबाराच्या फैरींनी हादरले. हल्लेखोर चेरीफ व सईद कौची हे ज्या गोदामात
दडी मारून बसले होते, त्या इमारतीला
वेढा घातला.
गोळीबार व ओलीस नाट्य : पॅरिसच्या पूर्वेकडील कोशेर सुपरमार्केटमध्ये शिरलेल्या एका बंदुकधारीने पाच जणांना ओलीस ठेवले. पोलिसांनी हल्ला केल्यास त्यांना ठार मारण्याची धमकी त्याने दिली होती. कोशेर सुपरमार्केटचा पोर्त दि व्हिन्सेनेस हा भाग पोलिसांनी सीलबंद केला. या भागाला छावणीचे स्वरूप आले होते. या हल्लेखोराने केलेल्या गोळीबारात अनेक जण जखमी झाले.
हल्लेखोर होते मृत्यूस तयार
च्हल्लेखोर चेरीफ व सईद कौची यांनी आपण मरणास घाबरत नसल्याचे सांगत मृत्यूला सामोरे जाण्याची व मिशनसाठी ‘हौतात्म्य’ पत्करण्याची तयारी दाखविली.
च्एका प्रत्यक्षदर्शीने दिलेल्या माहितीनुसार एका संशयिताचा पेहराव काळा असून, त्याच्या अंगावर बुलेटप्रूफ जाकीट होते. त्याच्याकडे एके-५६ सारखे स्वयंचलित रायफल होते. या प्रत्यक्षदर्शीने फ्रान्स इन्फो रेडिओला दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोरांनी या प्रत्यक्षदर्शीला निघून जाण्यास सांगितले.
च्आम्ही निरपराध नागरिकांना मारत नाही असे तो म्हणाला. या इमारतीत लपण्याआधी आरोपीनी जवळच्याच एका महिलेची गाडी चोरली होती. गाडी चोरणारे हे दोघे भाऊ असल्याचे त्याच महिलेने सांगितले.
पोलिसांचे एक हेलिकॉप्टरही कारवाईसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. फ्रेंच कमांडोंनी नियोजनपद्धतीने प्रिटींग प्रेसच्या इमारतीवर चढाई करून त्यांचा खात्मा केला. हल्लेखोरांच्या गोळीबारात एक अधिकारी जखमी झाला आहे.