तारिक रहमान यांच्या हाती आता बांगलादेशची धुरा; नवे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, सत्तेचे हस्तांतरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 06:53 IST2026-02-18T06:52:17+5:302026-02-18T06:53:33+5:30

राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रहमान यांना ‘जातीय संसदे’च्या दक्षिण प्लाझा येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. आजपर्यंत पंतप्रधानांचा शपथविधी बंगभवनमध्ये होत होता. यावेळी वेगळे स्थान निवडले होते. १७ वर्षांनी रहमान डिसेंबरमध्ये मायदेशी परतले होते.

Tariq Rahman takes charge of Bangladesh; takes oath as new Prime Minister, transfers power | तारिक रहमान यांच्या हाती आता बांगलादेशची धुरा; नवे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, सत्तेचे हस्तांतरण

तारिक रहमान यांच्या हाती आता बांगलादेशची धुरा; नवे पंतप्रधान म्हणून घेतली शपथ, सत्तेचे हस्तांतरण

ढाका : बांगलादेश नॅशलनलिस्ट पार्टीचे अध्यक्ष तारिक रहमान (६०) यांनी मंगळवारी बांगलादेशचे नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. या शपथविधीमुळे ऑगस्ट २०२४ मध्ये शेख हसीना सरकार कोसळल्यानंतर सत्तेवर आलेल्या अंतरिम सरकारचा १८ महिन्यांचा कार्यकाळ संपुष्टात आला आहे.

राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी रहमान यांना ‘जातीय संसदे’च्या दक्षिण प्लाझा येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. आजपर्यंत पंतप्रधानांचा शपथविधी बंगभवनमध्ये होत होता. यावेळी वेगळे स्थान निवडले होते. १७ वर्षांनी रहमान डिसेंबरमध्ये मायदेशी परतले होते.

मंत्रिमंडळात हिंदू व बौद्ध सदस्यांचा समावेश

तारिक रहमान यांच्या नव्या मंत्रिमंडळात २५ मंत्र्यांना आणि २४ राज्यमंत्र्यांचा समावेश आहे. यांची खाती नंतर जाहीर केली जाणार आहेत. नव्या मंत्रिमंडळात बीएनपीचे उपाध्यक्ष निताई रॉय चौधरी (हिंदू) आणि दीपेन देवान (बौद्ध) या दोन अल्पसंख्याक समुदायांतील सदस्यांचाही समावेश आहे

भारताचे प्रतिनिधी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी रहमान यांची भेट घेतली. बिर्ला यांनी भारत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून शुभेच्छा देत त्यांना भारतभेटीचे निमंत्रणही दिले. दोन्ही नेत्यांनी लोककेंद्रीत सहकार्याच्या अजेंड्यावर एकत्र काम करण्याबाबत आशावाद व्यक्त केला.

Web Title : तारिक रहमान ने बांग्लादेश के नए प्रधानमंत्री के रूप में शपथ ली

Web Summary : बीएनपी अध्यक्ष तारिक रहमान ने बांग्लादेश के नए प्रधानमंत्री के रूप में शपथ ली। उनके मंत्रिमंडल में हिंदू और बौद्ध सदस्य शामिल हैं। एक भारतीय प्रतिनिधि ने पीएम मोदी की ओर से बधाई और निमंत्रण दिया। रहमान 17 साल बाद दिसंबर में स्वदेश लौटे।

Web Title : Tarique Rahman Sworn In as Bangladesh's New Prime Minister

Web Summary : Tarique Rahman, BNP's chairman, became Bangladesh's new Prime Minister after taking oath. His cabinet includes Hindu and Buddhist members. An Indian representative extended congratulations and an invitation from PM Modi. Rahman returned home in December after 17 years.