कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 06:14 IST2025-07-12T06:14:07+5:302025-07-12T06:14:58+5:30
कॅनडाने अनेक प्रकारची शुल्क आणि बिगरशुल्क धोरणे अंगिकारली आहेत. व्यापारी अडचणीही आहेत.’

कॅनडावरील टॅरिफ वाढवून केला ३५%; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा
वॉशिंग्टन : कॅनडातून आयात केलेल्या वस्तूंवरील टॅरिफ वाढवून ३५ टक्के करण्यात आल्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी
केली. अमेरिका व कॅनडा या दोन्ही देशांचे कित्येक दशकांपासून मैत्रीपूर्ण संबंध आहेत. डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आल्यापासून मात्र या संबंधांना तडा गेला आहे. नव्या करवाढीमुळे त्यांचे संबंध आणखी ताणले जातील, असे जाणकारांनी सांगितले.
कॅनडाचे पंतप्रधान मार्क कार्नी यांना लिहिलेल्या पत्रात ट्रम्प यांनी फेब्रुवारीमध्ये घोषित २५ टक्के शुल्क आणखी वाढविण्याचा उल्लेख केला. वाढीव कर १ ऑगस्टपासून लागू हाेईल. ट्रम्प यांनी म्हटले की, ‘कॅनडातून होणारी फेंटानाइलची तस्करी हेच काही आमच्यासाठी एकमेव आव्हान नाही. कॅनडाने अनेक प्रकारची शुल्क आणि बिगरशुल्क धोरणे अंगिकारली आहेत. व्यापारी अडचणीही आहेत.’
५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ कॅनडाच्या पंतप्रधानांना वाढीव
शुल्काचे पत्र पाठवण्याच्या काहीच तास आधी ट्रम्प यांनी ब्रिटिश पंतप्रधान केअर स्टॉर्मर यांच्यासोबतचे आपले एक छायाचित्र शेअर करून लिहिले होते की, ‘जागतिक व्यापाराच्या आव्हानांवर जग आता कॅनडासारख्या विश्वासार्ह आर्थिक भागिदाराकडे आशेने पाहत आहे!’. ट्रम्प यांनी दोन दिवसांपूर्वीच अनेक देशांविरोधातील आयात शुल्क ५० टक्क्यांपर्यंत वाढवले आहे.