ब्रँडेड औषधांनाही ‘टॅरिफ’ची कडू गोळी; ट्रम्प यांनी केली १००% आयात शुल्काची घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 06:20 IST2025-09-27T06:19:41+5:302025-09-27T06:20:37+5:30
ज्या कंपन्यांचे आधीच अमेरिकेत कारखाने आहेत, त्यांना कर कसा असेल, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.

ब्रँडेड औषधांनाही ‘टॅरिफ’ची कडू गोळी; ट्रम्प यांनी केली १००% आयात शुल्काची घोषणा
वॉशिंग्टन : ब्रँडेड औषधांच्या आयातीवर १०० टक्के आयात कर (टॅरिफ) लावण्याची घोषणा अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी केली. याशिवाय किचन कॅबिनेट, बाथरूम व्हॅनिटी, अपहोल्स्टर्ड फर्निचर आणि अवजड ट्रक यांच्यावरही ५० टक्क्यांपर्यंत टॅरिफ लावण्यात आले आहे. १ ऑक्टोबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
अमेरिकेच्या ‘फेडरल रिझर्व्ह’चे प्रमुख जेरोम पॉवेल यांनी नुकताच महागाई वाढण्याचा इशारा दिला होता. हा इशारा धुडकावून ट्रम्प यांनी नव्या टॅरिफची घोषणा केली आहे. अमेरिकेत कारखाने उभारत असलेल्या कंपन्यांना करातून सूट मिळेल, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ज्या कंपन्यांचे आधीच अमेरिकेत कारखाने आहेत, त्यांना कर कसा असेल, हे त्यांनी स्पष्ट केलेले नाही.
अमेरिकन लोकांचा खर्च वाढणार?
नव्या टॅरिफमुळे औषध आयातीचा खर्च दुपटीने वाढेल. त्यामुळे औषधांच्या किमतीही वाढतील. आरोग्यावरचा खर्च वाढून अमेरिकेत महागाईचा भडका
उडू शकतो, असा इशारा जाणकारांनी दिला आहे. किचन कॅबिनेटवरील टॅरिफमुळे घरबांधणीचा खर्च वाढेल