Taliban Tourism: तालिबानने देशाची सत्ता हाती घेतल्यापासून अफगाणिस्तान सातत्याने चर्चेत आहे. अशातच अफगाणिस्तानातील एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तालिबानशी जोडलेल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या एका प्रमोशनल व्हिडिओमध्ये अमेरिकन लोकांना पर्यटक म्हणून अफगाणिस्तानला भेट देण्याचे आमंत्रण देण्यात आलं आहे. हे आमंत्रण मात्र सामान्य नाही. व्हिडीओमध्ये अफगाण लोकांनी देशाची दहशतवादामुळे झालेली प्रतिमा पुसून टाकण्याचा आणि अमेरिकन लोकांना पर्यटनाचे ठिकाण म्हणून विचारात घेण्याचा सल्ला दिला आहे.
अफगाणिस्तानामध्ये तालिबानची सत्ता आल्यापासून तिथल्या पर्यटनाला खीळ बसली आहे. त्यामुळे अफगानी नागरिकांकडून पर्यटनाला चालना मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. आता तालिबानकडून जगभरातील पर्यटकांना अगणिस्तानमध्ये येण्याचं आमंत्रण देत आहे. विशेषतः अमेरिकन पर्यटकांनी अफगाणिस्तानाला भेट द्यावी अशी इच् त्यांनी व्हिडिओच्या माध्यामातून व्यक्त केली आहे. या व्हिडिओमध्ये अफगाणीस्तानातील पोशाखामध्ये एक अमेरिकी पर्यटक दाखवण्यात आला आहे.
नेमकं 'त्या' व्हिडिओमध्ये काय आहे?
'अमेरिकेला मेसेज' या टायटलपासून व्हिडिओची सुरुवात होते. व्हिडीओमध्ये बंदूक हातात घेतलेले ५ अफगाण सैनिक तीन मास्क घातलेल्या लोकांच्या मागे उभे आहेत. एक जण अमेरिकन नागरिक असून तो मास्क काढून म्हणतो की, "अफगाणिस्तानात आपले स्वागत आहे". त्यानंतर प्रत्येक फ्रेममध्ये अफगाणिस्तानाचे नैसर्गिक सौंदर्य दाखवण्यात आलं आहे. "आमच्या मातृभूमीला तुमच्यापासून मुक्त केल्यावर तुमचे आता पर्यटक किंवा पाहुण्यांच्या रुपात अफगाणिस्तान स्वागत करत आहे", असं या व्हिडिओचे स्लोगन आहे.
अफगाणिस्तान युद्धात त्रस्त असल्यामुळे बऱ्याच काळापासून अफगाणिस्तानला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या शून्यावर आली आहे. २०२१ मध्ये अमेरिका परतल्यानंतरही तिथली परिस्थिती काही केल्या सुधारली नाहीय. अफगाणिस्तानात पाहण्यासारखी अनेक नैसर्गिक पर्यटन स्थळे आहेत तिथे पर्यटकांनी यावे अशी तालिबान्यांची इच्छा आहे.