शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं
2
भारतीय लष्कराकडून पुन्हा एकदा ड्रोन स्ट्राईक, अनेक अतिरेकी ठार झाल्याचा दावा
3
बिहारच्या मतदार यादीत परदेशी लोकांची नावे; बांगलादेश, म्यानमार, नेपाळचे नागरिक आढळले
4
प्रियकरासोबत पत्नी वारंवार पळून जायची; घटस्फोट घेतला अन् दुधाने अंघोळ करुन आनंद साजरा केला
5
Video: IAS अधिकाऱ्याची परीक्षा हॉलमध्ये विद्यार्थ्याला मारहाण; कॉपी केल्याचा आरोप
6
IND vs ENG : 'गलीतली साडेसाती' संपली; जैस्वालचा 'यशस्वी' झेल! दुसऱ्यांदा रेड्डीच्या जाळ्यात फसला क्रॉउली (VIDEO)
7
पिवळी साडी... शेत... मादक अदा... पाहा, भारतीय क्रिकेटरच्या बहिणीचे ग्लॅमरस PHOTOS
8
वडिलांनीच घेतला मुलाची जीव, हॉटेलमध्ये नेले, बेदम मारहाण केली आणि...  
9
एचडीएफसी बँक, श्रीराम फायनान्सवर आरबीआयची कारवाई; दंड ठोठावला
10
"आतापर्यंत आम्ही एकट्याने निवडणुका लढवल्यात, आता…”, मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांदरम्यान बाळा नांदगावकरांचं सूचक विधान 
11
आंद्रे रसेलच्या पत्नीने केला 'हटके' स्टाईल वर्कआऊट; जेसिमचा भन्नाट VIDEO होतोय व्हायरल
12
IND vs ENG : नाद करा, पण आमचा कुठं? DSP सिराजनं असा घेतला बेन डकेटचा बदला (VIDEO)
13
विमान कराचीला जाणार होते पण सौदी अरेबियाला कसे पोहोचले? पाकिस्तान एअरलाइन्सचा निष्काळजीपणा
14
तुमचे १ कोटी रुपये किती दिवसात ५० लाख होतील? महागाईची हे गणित समजून घ्या, अन्यथा निवृत्तीनंतर पश्चात्ताप होईल!
15
लगाव बत्ती: 'राजे'नीती! रॉयल फॅमिली आणि शिवकालीन गनिमी कावा
16
RBI चा मोठा निर्णय! शेतकऱ्यांसह लघु उद्योजकांना होणार थेट फायदा? आता कर्ज मिळणे होणार सोपं
17
IND vs ENG : शतकाचा मोह नडला; स्ट्राइक देण्याच्या नादातच पंत ठरला 'बळीचा बकरा'; KL राहुल म्हणाला...
18
नाशिकमध्ये महिलेने पतीचा झोपेतच दाबला गळा, हत्या करून फेकले जंगलात; गावात खळबळ
19
धबधबे, बोटिंग आणि निसर्ग सौंदर्य; कांडवनला वर्षा पर्यटनासाठी पर्यटकांची गर्दी   
20
'तीन दिवसापूर्वीच कट रचला होता'; राधिका हत्या प्रकरणात मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा

हे काय...? पाकिस्तानी सैनिकांचा जीव घेतोय तालिबान; तरीही त्यांच्याच सेवेत 'मशगूल' पाकिस्तान...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2021 19:43 IST

रविवारी तालिबानच्या गोळीबारात दोन पाकिस्तानी सैनिकांचा जीव गेला. यापूर्वी गुरुवारीही तालिबानने एका पाकिस्तानी सैनिकाला ठार केले.

एकीकडे तालिबानपाकिस्तानीसैनिकांचा जीव घेत आहे. अफगाण सीमेवरून सातत्याने त्यांच्यावर फायरिंग सुरू आहे. रविवारी तालिबानच्या गोळीबारात दोन पाकिस्तानीसैनिकांचा जीव गेला. यापूर्वी गुरुवारीही तालिबानने एका पाकिस्तानी सैनिकाला ठार केले. असे असतानाही दुसरीकडे मात्र, पाकिस्तान तालिबानच्याच सेवेत मशगूल असल्याचे दिसत आहे. (Taliban kill Pakistani soldiers; Still, Pakistan is 'busy' in their help)

आजची स्थिती अशी आहे, की प्रत्येकजण तालिबानच्या छायेपासून दूर राहण्याचाच प्रयत्न करत आहे. मात्र, पाकिस्तानने तालिबानच्या ताब्यात असलेल्या भागांत वैद्यकीय साहित्यांचा पुरवठा करण्याची घोषणा केली आहे. यासंदर्भात, अफगाणिस्तानातील पाकिस्तानचे राजदूत मन्सूर अहमद खान यांनी ट्विटरवर घोषणा केली आहे.

अफगाणिस्तानात तालिबानची किती दहशत...? अफगाण पत्रकारांनी जगाच्या नावानं लिहिलं खुलं पत्र

शिकवतायत माणूसकी -मन्सूर अहमद खान यांच्या घोषणेनुसार, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे कारगो विमान जागतिक आरोग्य संघटनेचे वैद्यकीय साहित्य घेऊन इस्लामाबादहून मजार-ए-शरीफ येथे जाईल. मजार-ए-शरीफ या शहरावर तालिबानने 14 ऑगस्टलाच ताबा मिळविला होता. मन्सूर अहमद खान यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे, की आंतरराष्ट्रीय संस्थांच्या सहकार्याने हे एक मानवतावादी पाऊल असेल. अफगाणिस्तानमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा अत्यंत महत्त्वाचा आहे. मात्र, हे विमान अफगाणिस्तानात केव्हा उतरणार, यासंदर्भात स्पष्ट माहिती मिळालेली नाही.

तालिबानला जगातील सर्वच देशांसोबत हवे आहेत चांगले संबंध; भारतासंदर्भात केलं असं भाष्य

मजार-ए-शरीफ हे अफगाणिस्तानातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात मोठे शहर असून बाख प्रांताची राजधानी आहे. अमेरिकेने अफगाणिस्तानातून आपले सैन्य काढण्याची घोषणा केल्यानंतर काही दिवसांतच तालिबानने या शहरावर कब्जा केला होता. यानंतर 15 ऑगस्टला तालिबानने काबूलवर कब्जा केला होता. यानंतर अफगाण राष्ट्रपती देश सोडून पळून गेले होते आणि आता तालिबानी दहशतवाद्यांनी संपूर्ण अफगाणिस्तानात हाहाकार माजवला आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानterroristदहशतवादीPakistanपाकिस्तानSoldierसैनिक