Taliban in kabul Video : भयंकर... हा हॉलिवूडच्या चित्रपटातील सीन नसून काबुल विमानतळाची सद्यस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2021 03:46 PM2021-08-16T15:46:49+5:302021-08-16T15:48:25+5:30

अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत.

Taliban in kabul Video : Terrible ... This is not a scene from a Hollywood movie, but the current situation at Kabul Airport | Taliban in kabul Video : भयंकर... हा हॉलिवूडच्या चित्रपटातील सीन नसून काबुल विमानतळाची सद्यस्थिती

Taliban in kabul Video : भयंकर... हा हॉलिवूडच्या चित्रपटातील सीन नसून काबुल विमानतळाची सद्यस्थिती

googlenewsNext

काबुल - अमेरिकी सैन्याने अफगाणिस्तान सोडल्यानंतर काही काळातचं तालिबानने सक्रीय होतं, अफगाणिस्तानातील बहुसंख्य शहरांचा ताबा घेतला. रविवारी अफगाणिस्तानात मोठ्या घडामोडी घडल्या. तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबूलमध्ये प्रवेश करुन राष्ट्रपती भवन आपल्या ताब्यात घेतलं. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी यांच्यासह अनेक मोठे नेते देश सोडून गेले आहेत. त्यामुळे, अनेक नागरिकही विमानतळावर गर्दी करत आहेत. येथील काही व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत.  

अफगाणिस्तानातील हजारो सामान्य नागरिकही काबूल सोडून इतर देशांमध्ये जाण्याचा प्रयत्न करत आहेत. याचे व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होतोय. अनेक नागरिक तालिबानच्या जुलमी राजवटीत राहण्यापेक्षा देश सोडण्याचा विचार करत आहेत. काबूलमधून बाहेर जाणाऱ्या विमानांमध्ये बसण्यासाठी नागरिकांची झुंबंड उडाली आहे. तर, विमानतळावर मुंबईतील लोकल रेल्वे पकडण्यासाठी होत असलेल्या गर्दीचे रुपडे दिसत आहे. 


काबुल विमानतळावर झालेल्या गोळीबारात आत्तापर्यंत 5 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. विमानतळावरही विदारक परिस्थिती पाहायला मिळत आहे. पत्रकार Natalie Amiri यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, विमानतळावर जमीनीपासून काही उंचीवरच हेलिकॉप्टर उडताना दिसत आहेत. येथील रनवे रिकामा करण्याचा प्रयत्न तालिबानकडून होत आहे. एक भयंकर व्हिडिओ समोर आला असून अमेरिकन सैन्य दलाच्या विमानच्या खालील भागाला पकडून काबुलमधून बाहेर पडण्याचा प्रयत्न नागरिकांनी केला. मात्र, विमानाने गती घेताच, हे नागरिक खाली कोसळले आहेत. 
एका प्राध्यापकाने मुस्लीम शिरजाद यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा व्हिडिओ शेअर केला आहे. 

Web Title: Taliban in kabul Video : Terrible ... This is not a scene from a Hollywood movie, but the current situation at Kabul Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.