शहरं
Join us  
Trending Stories
1
गरीब, महिला युवा, शेतकरी व वंचित घटकांच्या सेवेसाठी सज्ज; NDA चा ठराव, मोदी हेच प्रमुख नेते
2
NDA च्या बैठकीत नरेंद्र मोदींची 'नेते' पदी निवड; आजच सत्ता स्थापनेचा दावा करणार?
3
Lok Sabha Election Result 2024 :"आगे, आगे देखो होता...", नितीश कुमारांसोबत एकाच विमानातून प्रवासानंतर तेजस्वी यादवांचे सूचक विधान
4
भाजपासमोर आणखी एक संकट; सरकार बनवण्यापूर्वीच घटक पक्षांच्या मागणीनं टेन्शन वाढलं
5
"फडणवीसांनी सरकारमध्ये राहणं अतिशय आवश्यक आहे, कारण..."; भुजबळांचे रोखठोक विधान
6
नितीश कुमारांनी पलटी मारली, तरीही भाजप स्थापन करू शकतं NDA सरकार; असं आहे संपूर्ण समिकरण
7
जय-पराजय हा राजकारणाचा भाग, आकड्यांचा खेळ सुरूच राहिल; मोदींचे मंत्रिपरिषदेमध्ये 'संकेत'
8
उद्धव ठाकरेंच्या १३ पैकी ७ जागांवर एकनाथ शिंदेंची बाजी; ६ जागा ठाकरेंनी राखल्या
9
“लोकसभा निवडणुकीतील सुमार कामगिरीमुळे फडणवीसांचे राजीनाम्याचे नाटक”; काँग्रेसची टीका
10
एअर इंडियाच्या भाड्यावर तुमचे कंट्रोल असणार; कंपनीने सुरू केली 'ही' खास सुविधा...
11
केंद्राचे 'डबल इंजिन' पटरीवरुन उतरले; भाजपशासित राज्यातच पक्षाचे सर्वाधिक नुकसान...
12
"हे सरकार जितके दिवस चालेल..."; फडणवीसांनी राजीनाम्याचे संकेत देताच विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला
13
भाजपात काहीतरी धुमसतेय? मोहित कंबोज यांचे ट्विट, "एका व्यक्तीचं महत्व कमी करण्यासाठी पक्षाचं नुकसान..."
14
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : Ohh Shit! भारताच्या सामन्यावर संकट, आयर्लंडला लागेल लॉटरी 
15
मोठी बातमी! INDIA आघाडीच्या दिल्लीतील बैठकीला उद्धव ठाकरे जाणार नाहीत, काय घडतंय?
16
"फडणवीसांनी दिल्लीची दिशाभूल केली अन् मोदींना तोंडावर पाडलं": पृथ्वीराज चव्हाण
17
T20 World Cup 2024 IND vs IRE Live Match : रोहित शर्माला खुणावतोय MS Dhoniचा मोठा विक्रम, कोहलीही करणार 'विराट' पराक्रम 
18
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का! न्यायालयीन कोठडीत वाढ, अंतरिम जामीन अर्जही फेटाळला
19
Hero Motocorp Share Price : 'या' बाईक कंपनीच्या शेअरनं पकडला तुफान स्पीड, गुंतवणूकदारांच्या उड्या; बनवला रेकॉर्ड
20
किरण सामंतांनी दगाफटका केला? उबाठाच्या अदृश्य हातांची मदत झाली, नितेश राणेंच्या दाव्याने खळबळ

तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

By ऑनलाइन लोकमत | Published: September 02, 2021 6:45 PM

अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले.

काबूल - अफगाणिस्तानवर कब्जा केल्यानंतर, आता तालिबान शुक्रवारी नव्या सरकारची घोषणा करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालिबानकडून नव्या सरकारची घोषणा शुक्रवारच्या नमाजानंतर केली जाईल. 15 ऑगस्ट रोजी तालिबानने काबूलवर ताबा मिळवला. आता अफगाणिस्तान पूर्णपणे तालिबानच्या वर्चस्वाखाली आला आहे. अमेरिकेन आपले सैन्य सोमवारी रात्रीच अफगाणिस्तानातून बाहेर काढले आहे. (Taliban to form govt in afghanistan tomorrow after friday prayers)

अफगाणिस्तानातून अमेरिकन सैन्या बाहेर पडल्यानंतर तालिबानी दहशतवाद्यांनी हवेत गोळीबार करून आनंद साजरा केला होता. अफगाणिस्तानची आर्थिक स्थिती प्रचंड बिघडलेली आहे आणि तो मोठ्या प्रमाणावर जगाच्या मदतीवर अवलंबून आहे. असे असताना तालिबान अफगाणिस्तानवर राज्य करणार आहे. यामुळे आगामी काळात तालिबान कशा प्रकारे वाटचाल करते, हे पाहावे लागेले.

बगराम एअरपोर्ट मिळविण्याच्या प्रयत्नात चीन; भारताविरोधात आखतोय अशी रणनीती

कोन असेल अफगाणिस्तानचा सुप्रीम लिडर?अफगानिस्तानातील माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तालिबानी नेता हैबतुल्ला अखुंदजादा या सरकारचा सर्वेसर्वा अर्थात सुप्रीम लिडर असेल आणि पंतप्रधान अथवा राष्ट्रपती त्यांच्या आदेशावरच काम करतील. टोलो न्यूजच्या वृत्तानुसार, तालिबानच्या सांस्कृतिक आयोगाचा सदस्य अनामुल्ला समांगनी याने म्हटले आहे, की "नवीन सरकार स्थापनेबाबत चर्चा जवळजवळ पूर्ण झाली आहे आणि मंत्रिमंडळासंदर्भातही निर्णय घेण्यात आला आहे. आम्ही जाहीर करू ते इस्लामीक सरकार, लोकांसाठी आदर्श सरकार असेल. अखुंदजादाच्या नेतृत्वात सरकार बनण्यासंदर्भात कसल्याही प्रकारची शंका नाही. तो सरकारचा प्रमुख असेल, यावरबाबत कुठलाही प्रश्न उद्भवत नाही."

"भारतानं 20 वर्षं शत्रूला मदत केली..."; काश्मीरसंदर्भात तालिबान स्पष्टच बोलला!

कंधारमधून काम करतील अखुंदजादा?मुल्ला हैबतुल्ला अखुंदजादा हे याआधी कधी समोर आले नाहीत. त्यांच्या ठिकाणांबद्दल कोणाला खास माहिती नाही. ते नवीन सरकारमध्ये कंधारमधून काम करतील असे समजते. एका वृत्तानुसार, तालिबानने यापूर्वीच विविध प्रांत आणि जिल्ह्यांसाठी राज्यपाल, पोलीस प्रमुख आणि पोलीस कमांडर नेमले आहेत.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादीIslamइस्लामNamajनमाज