शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
3
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
4
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
5
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
6
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
7
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
8
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
9
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
10
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
11
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
12
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
13
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
14
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
15
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
16
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
17
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
18
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
19
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
20
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...

AK-47च्या धाकानं धावणार अर्थव्यवस्था? तालिबान सरकारमध्ये हा दहशतवादी झाला सेंट्रल बँकेचा प्रमुख

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2021 17:31 IST

तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत.

काबूल - आपल्याला अफगाणिस्तानच्या अंतरिम सरकारबद्दल माहिती असेलच. आपल्याला हेही माहित असेलच, की पंतप्रधान, उपपंतप्रधान ते गृहमंत्र्यांपर्यंत मंत्रिमंडळातील जवळपास १४ सदस्य हे संयुक्त राष्ट्रांच्या काळ्या यादीतील दहशतवादी आहेत. दरम्यान, अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक 'दा अफगाणिस्तान बँके'चा (DAB) बंदूकधारी प्रमुख हाजी मोहम्मद इद्रिसचा (haji mohammad idris) फोटोही व्हायरल झाला आहे. यात तो कार्यालयात बसून लॅपटॉप चालवताना दिसत आहे आणि त्याच्या टेबलवर बंदूकही ठेवण्यात आलेली आहे. (Taliban da Afghanistan bank chief haji mohammad idris pics with gun goes viral)

तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्ला मुजाहिदने नुकतेच इद्रिसला डीएबीचा प्रमुख केल्याची घोषणा केली. भारतीय रिझर्व्ह बँकेप्रमाणेच डीएबी ही अफगाणिस्तानची मध्यवर्ती बँक आहे. बँकिंग क्षेत्रासह अर्थव्यवस्थाही प्रामुख्याने हिच्या धोरणावरच अवलंबून असेत.

ऑस्ट्रेलियाची तालिबान्यांना धमकी; महिला क्रिकेटला मान्यता द्या, नाही तर...

जबीहुल्ला मुजाहिदने एक ट्विट करत, "सरकारी संस्था आणि बँकिंग क्षेत्राशी संबंधित गोष्टी व्यवस्थित करण्यासाठी आणि लोकांच्या समस्या सोडविण्यासाठी हाजी मोहम्मद इद्रिसची डीएबीचा कार्यवाहक प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याचे म्हटले होते. हाजी मोहम्मद इद्रिस हा अफगाणिस्तानातील जौझानचा रहिवासी आहे आणि तो तालिबानच्या आर्थिक आयोगाचा प्रमुख राहिला आहे.

अफगाणिस्तानात पत्रकारांसोबत तालिबानची क्रूरता; आंदोलक महिलांनाही जबर मारहाण

तालिबान सरकारच्या मदतीसाठी चीनची ३१० लाख डॉलरच्या मदतीची घोषणा -तालिबान सरकारला पाठिंबा देण्याबाबत बहुतांश देश आताच्या घडीला वेट अँड वॉच स्थितीत आहेत. मात्र, चीनने नवीन तालिबान सरकारसाठी तब्बल ३१० लाख अमेरिकन डॉलरच्या मदतीची घोषणा केली आहे. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. चीन आर्थिक मदतीसह तालिबान सरकारला अन्नधान्य, औषधे, लसी, कपडे याचीही मोठ्या प्रमाणावर मदत करणार असल्याचे सांगितले जात आहे. पहिल्या टप्प्यात चीन अफगाणिस्तानला ३० लाख लसीही दान म्हणून देणार असल्याचे समजते. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानterroristदहशतवादीbankबँक