शहरं
Join us  
Trending Stories
1
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
2
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
3
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
16
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
17
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
18
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
19
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
20
देश सर्वप्रथम!- नि:स्पृह राष्ट्रसाधनेची १०० वर्षे!

Afghanistan Crises: धक्कादायक! तालिबान्यांनी गोळीबारानं केलेल्या सेलिब्रेशनमध्ये लहान मुलांसह अनेकांचा मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2021 08:58 IST

Afghanistan Crises: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यातही कब्जा केला आहे. याबाबतची माहिती समोर येताच तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुल विमानतळावर हवेत गोळीबार करत जोरदार सेलिब्रेशन केलं.

Afghanistan Crises: तालिबाननं आता पंजशीर खोऱ्यातही कब्जा केला आहे. याबाबतची माहिती समोर येताच तालिबानच्या दहशतवाद्यांनी काबुल विमानतळावर हवेत गोळीबार करत जोरदार सेलिब्रेशन केलं. या सेलिब्रेशनमध्ये झालेल्या गोळीबारात काही लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. पंजशीर खोऱ्यात तालिबान आणि नॉदर्न अलायन्स यांच्यात गेल्या काही दिवसांपासून जोरदार संघर्ष सुरू होता. संपूर्ण अफगाणिस्तानवर तालिबाननं मिळावला असला तरी पंजशीर खोऱ्यात तालिबानला नियंत्रण मिळवता आलेलं नव्हतं. अखेर काल रात्री पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळाल्याची माहिती मिळताच काबुल विमानतळावरील तालिबान्यांनी जोरदार सेलिब्रेशन करण्यास सुरुवात केली. अफगाणिस्तानतील स्थानिक पत्रकार जियार खान यांनीही काबुलमधील तालिबान्यांच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ ट्विट केला आहे. ( Taliban claimed possession of Panjshir Heavy celebratory shots fired in Kabul children killed)

स्थानिक अफगाण वृत्तसंस्था असवाकाच्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री तालिबान्यांकडून केल्या गेलेल्या सेलिब्रेशनमध्ये हवेत गोळीबाराच्या घटनेत काबुलमध्ये लहान मुलांसह काही लोक मारले गेले आहेत. काबुलमध्ये शुक्रवारी रात्री जोरदार गोळीबाराचा आवाज ऐकू येत होता. तालिबाननं पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवल्याची घोषणा केली होती. नॉदर्न अलायन्सचा पराभव केल्याची घोषणा तालिबानकडून करण्यात आली आहे. याचच सेलिब्रेशन करताना तालिबान्यांनी हवेत गोळीबार करण्यास सुरुवात केली आणि त्यांना कशाचच भान नव्हतं. यात निष्पाप लहान मुलांचा बळी गेल्याची माहिती समोर आली आहे. जखमी नागरिकांचे नातेवाईक जखमींना रुग्णालयात घेऊन जातानाचे व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाले आहेत. 

तालिबानच्या एका कमांडरनं पंजशीर खोऱ्यावर नियंत्रण मिळवल्याचा दावा केला आहे. अल्लाहच्या कृपेनं आता संपूर्ण तालिबानवर आमचं नियंत्रण आहे. नॉदर्न अलायन्सचा पराभव झाला आहे आणि पंजशीर देखील आमच्या नियंत्रणाखाली आहे, अशी माहिती तालिबानी कमांडरनं रॉयटर्स या वृत्तसंस्थेला दिली आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान