शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

"पहिले बॉम्ब टाकले असते, मग सैनिकांना बोलावलं असतं"; वक्तव्यानंतर नेटकऱ्यांनी ट्रम्प यांनाच घेरलं 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 20:34 IST

Afghanistan Taliban Crisis : डोनाल्ड ट्रम्प यांच्या जो बायडेन यांना दिलेल्या सूचनेनंतर ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांची टीका. सैन्य माघारी बोलावण्यावरून ट्रम्प यांनी साधला होता बायडेन यांच्यावर निशाणा.

ठळक मुद्दे डोनाल्ड ट्रम्प यांच्या जो बायडेन यांना दिलेल्या सूचनेनंतर ट्रम्प यांच्यावर नेटकऱ्यांची टीका. सैन्य माघारी बोलावण्यावरून ट्रम्प यांनी साधला होता बायडेन यांच्यावर निशाणा.

अमेरिकेनं अफगाणिस्तानमधून सैन्याला माघारी बोलावल्यानंतर अफगाणिस्तानाततालिबाननं पुन्हा कब्जा मिळवला. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या या निर्णयानंतर अनेक स्तरातून त्यांच्यावर टीका करण्यात आली. दरम्यान, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीदेखील त्यांच्यावर निशाणा साधला होता. अराजकता माजण्यापासून वाचण्यासाठी अमेरिकन नागरिकांना सुरक्षित, हळूहळू आणि व्यवस्थितरित्या बाहेर काढण्याचा सल्ला ट्रम्प यांनी बायडेन यांना दिला. परंतु ट्रम्प यांच्या या सल्ल्यावरून नेटकऱ्यांमध्ये मात्र भ्रम निर्माण झाला. 

बायडेन प्रशासनानं आपल्या नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढण्यासाठी हजारो अमेरिकान सैनिकांना काबुल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचवलं आहे. दरम्यान, अमेरिकन नागरिकांना पहिले या ठिकाणाहून बाहेर काढलं पाहिजे होतं आणि त्यानंतर सैन्याला परत बोलवायला हवं होतं, अशा सूचना त्यांनी केल्या. त्यानंतर त्यांनी आणखी एक सूचना केली की बाहेर निघण्यापूर्वी अमेरिकेला काही ठिकाणी बॉम्ब टाकायला हवे होते.

"पहिल्यानंदा तुम्ही अमेरिकन नागरिकांना अफगाणिस्तानातून बाहेर काढलं असतं. त्यानंतर सैन्याचं सामान आणलं असतं आणि त्यांनंतर तुम्ही काही ठिकाणी बॉम्ब टाकले असते आणि त्यानंतर सैन्याला बाहेर काढलं असतं. परंतु आपल्या लष्कराच्या अधिकाऱ्यांनी केलं त्या उलट्या क्रमानं नसतं केलं. अशा प्रकारे काम केलं असतं तर अराजकता माजली नसती. कोणाचा मृत्यू झाला नसता आणि तालिबानला आपण गेलो हे समजलंही नसतं," असं ते म्हणाले. परंतु सैनिकांना माघारी बोलावण्यापूर्वीच बॉम्ब टाकण्याच्या त्यांच्या वक्तव्यावरून सोशल मीडियावर भ्रम निर्माण झाला. अनेकांनी डोनाल्ड ट्रम्प हे आपल्याच सैनिकांवर बॉम्ब टाकण्यास सांगत आहेत का असा प्रश्न विचारला. तर एका युझरनं ते आपलं सैन्य बाहेर काढण्यापूर्वीच बॉम्बचा वर्षाव करण्याच्या सूचना का करत आहेत? असा प्रश्न विचारला.

टॅग्स :Donald Trumpडोनाल्ड ट्रम्पAmericaअमेरिकाAfghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानTwitterट्विटरSocial Mediaसोशल मीडिया