लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2021 12:15 PM2021-09-09T12:15:34+5:302021-09-09T13:11:38+5:30

Corona vaccination: कॅनडा आणि अमेरिकन एअरलाइन्सने लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना लस घेण्याचा आदेश जारी केला आहे.

Take the vaccine otherwise you will be fired, an order issued by two major airlines | लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

लस घ्या अन्यथा नोकरीला मुकावं लागणार, दोन मोठ्या विमान कंपन्यांनी जारी केला आदेश

Next

सध्या जगातील अनेक देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. या वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर जगातील दोन मोठ्या विमान कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. कॅनडाच्या वेस्ट जेट आणि अमेरिकेच्या युनायटेड एअरलाइन्सने त्यांच्या सर्व कर्मचाऱ्यांना कोविड लस घेणे बंधनकारक केले आहे. तसेच, लस न घेतल्यास नोकरीवरुन काढण्यात येईल, असेही सांगितले आहे.

24 सप्टेंबरपर्यंत मुदत

कॅनडाच्या वेस्ट जेटने आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना येत्या 24 सप्टेंबरपर्यंत लसीकरणाचा अहवाल देण्यास किंवा 30 ऑक्टोबरपर्यंत पूर्णपणे लसीकरण करण्यास सांगितले आहे. कंपनीच्या वतीने सांगण्यात आले आहे की, आधी असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी लसीकरण आवश्यक असेलच, याशिवाय येत्या काळात नवीन नोकरीवर येणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही लसीकरण करुनच नोकरी दिली जाईल. 

अमेरिकन एअरलाइने जारी केला आदेश
दरम्यान, अमेरिकेतील यूनायटेड एअरलाइंसने 27 सप्टेंबरची मुदत दिली आहे. या तारखेपर्यंत सर्व कर्मचाऱ्यांना लस घेणे बंधनकारक असेल. कंपनीकडून अधिकृत आदेश जारी करुन लसीकरण अनिवार्य केले आहे. लसीकरण न केल्यास कर्मचाऱ्यांना आपल्या नोकरीला मुकावं लागेल आणि पगारही दिला जाणार नाही.

डेल्‍टा व्हेरिएंटने वाढवली चिंता
अमेरिकेतील इतर विमान कंपन्याही कोरोना नियमांचे काटेकोरपणे पालन करत आहेत. डेल्‍टा एअरलाइनकडून लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांना 200 डॉलरचा मासिक दंड आकारण्यात येतोय. याशिवाय, कोरोना लस न घेणाऱ्या कर्मचाऱ्यांची पेड लीव्ह रद्द केली जाणार आहे. सध्या अनेक देशात डेल्टा व्हेरिएंटने भीती वाढवली आहे. 
 

 

Web Title: Take the vaccine otherwise you will be fired, an order issued by two major airlines

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.