Taiwan Building Fire: तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2021 05:18 PM2021-10-14T17:18:05+5:302021-10-14T17:18:45+5:30

Taiwan Building Fire: आगीने रौद्ररुप धारण केले होते. इमारतीचे पाच ते सहा मजले जळून खाक झाले आहेत.

Taiwan Building Fire: 46 Dead After Fire Breaks Out In Taiwan Building | Taiwan Building Fire: तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Taiwan Building Fire: तैवानमध्ये 13 मजली इमारतीला भीषण आग; 46 जणांचा मृत्यू, अनेक जखमी

Next

तैवानच्या दक्षिणेकडील एका 13 मजल्यांच्या रहिवासी इमारतीला भीषण (Taiwan Building fire) आग लागली. यामध्ये 46 जणांचा होरपळून मृत्यू झाला तर अनेक लोक भाजल्या व धुरामुळे जखमी झाले आहेत. 

काऊशुंग शहरामध्ये ही घटना घडली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, पहाटे 3 च्या सुमारास ही आग लागली. 55 लोकांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. यापैकी 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तैवानमध्ये मृत्यूचा अधिकृत आकडा हा ह़ॉस्पिटलमध्ये मृतदेह नेल्यावरच जाहीर केला जातो. 11 लोकांचा जागेवरच मृत्यू झाला आहे. जवान बचाव कार्यात गुंतले आहेत. 

आगीने रौद्ररुप धारण केले होते. इमारतीचे पाच ते सहा मजले जळून खाक झाले आहेत. आगीचे कारण अद्याप समोर आलेले नसून स्थानिकांनी पहाटे तीनच्या सुमारास स्फोटाचा आवाज ऐकल्याचे सांगितले.  मृतांमध्ये सर्वाधिक सात ते नवव्या मजल्यावर राहणारे लोक आहेत. 

Web Title: Taiwan Building Fire: 46 Dead After Fire Breaks Out In Taiwan Building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app
टॅग्स :fireआग